NGN News
Latest Marathi News

गर्भवती निदा खानचा जामीनासाठी अर्ज; उद्या सुनावणीची शक्यता

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : टीसीएस प्रकरणातील ‘मास्टर माइंड’ समजली जाणारी संशयित फरार आरोपी निदा खान हिने अटक टाळण्यासाठी आता कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून फरार असलेली निदा गर्भवती असल्याची माहिती असून तिने अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून नाशिकरोड न्यायालयात अर्ज केला आहे.

कंपनीत कार्यरत तरुणींवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या प्रकरणात निदा खान हिचे नाव पुढे आले. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके मुंबई, पुणे, भिवंडी आदि शहरांत रवाना झाली आहेत. मात्र, अद्याप निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. मध्यंतरी ती भिवंडीत असल्याची वंदता होती, तथापि, ती चर्चाच ठरली. आता गर्भवती असलेल्या निदाने जामीनासाठी नाशिकरोड न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर शनिवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हे आहेत आरोप ..

टीसीएस कंपनीच्या नाशिक कार्यालयात काम करणाऱ्या तरुणींना हेरून त्यांचे ब्रेनवॉश करणे आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी मानसिक दबाव टाकणे, असे कृत्य ती करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मोठे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, निदा खानच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे होऊ शकतात.

Comments are closed.