
- लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण; २५० पैकी १६२ गुण प्राप्त
** एनजीएन न्यूज नेटवर्क
सटाणा : श्रीकांत रौंदळ
बालपणापासून आई वडिलांकडून मिळालेली प्रेरणा,मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद सोबत घेऊन रात्रंदिवस जिद्दीने मेहनत करून दरेगाव( ता. बागलाण) येथील शिक्षक व वकील या दांपत्याचा सुपुत्र रोशन देवराव पवार यांने लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्यात सातव्या क्रमांकाने न्यायाधीश पदाचे यश संपादन केले आहे.
रोशन याचे प्राथमिक शिक्षण दरेगाव, ताहाराबाद येथे झाले तर माध्यमिक शिक्षण भाऊसाहेब नगर येथील कर्मवीर काकासाहेब वाघ विद्याभवन येथे केले. मविप्र संस्थेच्या सटाणा महाविद्यालयात बी.ए. केल्यानंतर एल. एल. बी. व एल.एल.एम., पूर्ण केले. अँड. गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.
न्यायाधीश पदाचा निकाल लागला असता रोशन याने २५० पैकी १६२ गुण प्राप्त करून महाराष्ट्र राज्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन न्यायाधीश पद प्राप्त केले आहे. दरम्यान न्यायाधीश रोशन याचे आपल्या गावी आगमन होताच कुटुंबीयांकडून पूजन करून त्याला पेढे भरविण्यात आले. बँड, ढोल ताशांच्या गजरात व गुलाल उधळून फटाके फोडून रोशन व त्यांच्या आई-वडिलांची वाजत गाजत मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी आमदार दिलीप बोरसे, अरुणकुमार भामरे, इंजि. रोहिदास जाधव , प्रवीण देवरे ,केवळ देवरे, शिवाजी जाधव, मेहुल जाधव, नंदराज पवार, रमेश पवार, योगेश पवार, क्रांती देवरे, वैष्णव पवार, ज्योती पवार, अर्चना पवार, हेमांगी देवरे, प्रभाकर भामरे, संजय पवार, जगदीश पवार ,अरुण पाटील, सुरेश देवरे, महेश देवरे, विवेक मानकर, चेतन गांगुर्डे, शुभम अहिरे, दीपक कांकरिया, निलेश कांकरिया यांच्यासह सटाणा वकील संघ, बागलाण तालुका प्राथमिक शिक्षक संघटना, गुरुकुल हाउसिंग सोसायटीचे सदस्य, ताहाराबाद पिंपळकोठे दरेगाव, निताने येथील ग्रामस्थांनी रोशन पवार याचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले.
Comments are closed.