NGN News
Latest Marathi News

इंधन दरवाढीचा तिसऱ्यांदा तडाखा ! नाशिकमधील दर किती ?

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पेट्रोलचा प्रतिलीटर दर 87 पैसे आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 91 पैशांनी वाढले आहेत. शिवारी सकाळपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

गेल्या 15 मे रोजी पेट्रोल दरात 3 रुपये आणि डिझेल दरात 3.11 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर चारच दिवसांनी अर्थात 20 मे रोजी   या दरांत अनुक्रमे 86 पैसे आणि 83 पैशांची वाढ करण्यात आली होती. इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकायचे ठरवले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ झाली आहे. अवघ्या आठ ते नऊ दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. 

नाशिक शहरातील नवे इंधन दर :

पेट्रोल- 109.71
डिझेल-  96.26

Comments are closed.