
- स्टार हेल्थने आपल्या स्थापनेची २० वर्षे पूर्णझाल्यानिमित्त नॉन-मेट्रो आणि टियर २, ३ आणि ४ बाजारपेठांमध्येजवळपास २० टक्के कमीप्रीमियम देणारा आरोग्य विमा प्लॅन आणला आहे.·
- वैयक्तिक आणि फॅमिली फ्लोटर कव्हरसाठी २५ लाख रूपयांपर्यंतच्याविमा रकमेच्या पर्यायांसह‘व्हॅल्यूप्लस’ सादर.·
- अपुऱ्या सुविधा असलेल्या बाजारपेठांमधील तरुण भारतीयांसाठीसानुकूलित पॉलिसीसह”सर्वांसाठी विमा” या तत्त्वाचा विस्तार.·
- सलग ५ वर्षे कोणताही इन-पेशंट (रुग्णालयात दाखल झाल्याचा)क्लेम न केल्यास पहिल्या वर्षाचा मूळ प्रीमियम परत केला जाईल.·
- या खास तयार केलेल्या ऑफरमध्ये भारतातील ११,००० हून अधिक रुग्णालयांच्या नेटवर्कचा समावेश आहे.
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एनएसई:स्टारहेल्थ; बीएसई: 543412) या भारतातील अग्रणी स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीने आज टियर २-३-४ शहरांमधील तरुण भारतीयांना वाढीव आरोग्यसंरक्षण देण्यासाठी एका परवडणाऱ्या विमा सुविधेची घोषणा केली. ‘व्हॅल्यू प्लस’ नावाच्या या प्लॅनमध्ये निवडक रुग्णालय नेटवर्कच्या माध्यमातून ७.५ लाख रूपयेते २५ लाख रूपयांपर्यंतचे उच्च विमा संरक्षण जवळपास २० टक्के कमी प्रीमियममध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.लहान शहरांमधील लाखो लोकांसाठी आरोग्य सेवेचा वाढता खर्च हा विमा संरक्षणाच्या तुलनेत अधिक वेगाने वाढतअसलेल्या बाजारपेठेत, स्टार हेल्थव्हॅल्यू प्लसच्या माध्यमातून परवडणारे पर्याय उपलब्ध करून देत आहे. उच्च संरक्षणआणि प्रीमियमची किफायतशीरता यांचा समतोल साधत, १८ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रौढांसाठी आणि ९१ दिवसते २५ वर्षांपर्यंतच्या आश्रित मुलांसाठी कव्हर देऊन वैयक्तिक ग्राहक आणि कुटुंबांना सेवा देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
हे उत्पादनअनेक नॉन-मेट्रो शहरांमधील दर्जेदार रुग्णालयांच्या निवडक नेटवर्कमध्ये नियोजित आणि आपत्कालीन उपचार उपलब्ध करून देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. यासाठी रुग्णालयात दाखलहोण्याच्या गरजांशी सुसंगत अशी निश्चित रूम रेंट (खोलीचे भाडे) रचना सहाय्यकठरेल. ही रचना आवश्यक आरोग्य संरक्षणाशी कोणतीही तडजोड न करता प्रीमियममध्येकिफायतशीरपणा आणते, ज्यामुळेप्रीमियम जवळपास २०टक्क्यांनी कमी करण्यास मदत होते; तसेच रुग्णालयात दाखल होणे, आजारपणातून सावरणे, क्लेम-मुक्त सातत्य आणि वेलनेस सपोर्ट यांमधील प्रमुख फायदेयाद्वारे मिळत राहतात.
नाशिकमध्ये स्टार हेल्थची एकूण २६० नेटवर्क रुग्णालयांमध्ये उपस्थिती आहे, ज्यापैकी १३० पेक्षा अधिक रुग्णालये व्हॅल्यूप्लससाठी निवडक व्हॅल्यू नेटवर्क हॉस्पिटल्स आहेत. महाराष्ट्रात स्टार हेल्थचे सुमारे८७ शाखांचे एक मजबूत वितरण नेटवर्क आहे, त्यात १.२३ लाखांपेक्षा जास्त एजंट्स आहेत. याव्यतिरिक्त, कंपनीने राज्यात ५०.२ लाख व्यक्तींना विमा संरक्षणदिले आहे आणि आर्थिक वर्ष २०२६ मध्ये २२९४.१ कोटी रुपयांचे ३५८,०८० क्लेम्ससेटल (दावे मंजूर) केले आहेत.
या लाँचबाबत मत व्यक्त करत स्टार हेल्थ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ आनंद रॉय म्हणाले: “गेल्या २० वर्षांत, स्टार हेल्थ इन्शुरन्सने लाखो भारतीयांसाठी आरोग्य विमाअधिक विश्वासार्ह, सुलभ आणिपरवडणारा बनवण्यासाठी कार्य केले आहे. नाशिकमध्ये व्हॅल्यू प्लसच्यामाध्यमातून आम्ही टियर २, ३ आणि ४ मधील भारतातील अधिकाधिक व्यक्ती आणि कुटुंबांच्या आवाक्यात दर्जेदारआरोग्य विमा आणून हाच वारसा पुढे चालवत आहोत. नाशिक आमच्यासाठी महत्त्वाचीबाजारपेठ आहे आणि उच्च विमा रकमेचे पर्याय, रुग्णालयांचे निवडक नेटवर्क आणि वेलनेस-आधारित फायदे यांचामेळ घालत जवळपास २०टक्के कमी प्रीमियममध्ये सेवा देऊन व्हॅल्यू प्लस व्यापक ग्राहक वर्गासाठी विशेष नियोजित परवडणारा पर्याय उपलब्ध करून देतो. हे लाँच म्हणजे आरोग्य संरक्षणाचेलोकशाहीकरण करण्याच्या आमच्या ध्येयाचे सातत्य असून सर्वांसाठी विमा हे राष्ट्रीय ध्येय पुढे नेण्याच्या दिशेने टाकलेले एक व्यावहारिक पाऊल आहे.”
याबाबत आपले मत व्यक्त करत स्टार हेल्थ इन्शुरन्सचे महाराष्ट्रातील बिझनेस हेड विजय अरोरा म्हणाले:”व्हॅल्यू प्लस हे आजच्या ग्राहकांसाठी आरोग्य विमा अधिक प्रासंगिक, परवडणारा आणि सुलभ बनवण्यावरील आमच्या लक्ष्यालाअधोरेखित करते. उच्च विमाकृत राशी पर्याय,अत्यावश्यक आरोग्य सेवांचे फायदे, वेल्नेस सपोर्ट आणि प्रीमियममधील कार्यक्षमता एकत्रआणून हे उत्पादन कुटुंबांना वाढत्या वैद्यकीय गरजांचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. राज्यातील आमचे व्यापक वितरण नेटवर्कआणि निवडक रुग्णालयांपर्यंतच्या सुलभ प्रवेशासह, अधिकाधिक कुटुंबांना संपूर्ण आत्मविश्वासानेअर्थपूर्ण आरोग्य संरक्षण निवडण्यास सक्षम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
Comments are closed.