NGN News
Latest Marathi News

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून ओरल सेमाग्लुटाइड बायोसिमिलर ‘ओबेडा’ लाँच

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

 डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड या जागतिक फार्मास्युटिकल कंपनीने आज आपल्या ओरल सेमाग्लुटाइड बायोसिमिलरच्या लाँचची घोषणा केली, जे टाईप २ डायबेटीस मेलिटससाठी उपयुक्त आहे. डॉ. रेड्डीजचे ओरल सेमाग्लुटाइड भारतात ओबेडा या ब्रँड नावाखाली टॅब्लेट स्वरूपात उपलब्ध आहे. हे लाँच डॉ. रेड्डीजने अलीकडेच भारत आणि कॅनडामध्ये लाँच केलेल्या जेनेरिक सेमाग्लुटाइड इंजेक्शन पाठोपाठ झाले आहे, यामुळे जीएलपी-१ थेरपीजमधील कंपनीचे स्थान अधिक दृढ झाले आहे.

आयसीएमआर-इंडियाबी संशोधनानुसार, भारतात १०१ दशलक्षांपेक्षा जास्त प्रौढ व्यक्ती या आजारासह जगत असून याचे प्रमाण ११.४ टक्‍के आहे, ज्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठ्या मधुमेह प्रभावित देशांपैकी एक आहे. चिंताजनक बाब म्हणजे, जवळपास १३६ दशलक्ष व्यक्ती प्रीडायबेटीक आहेत आणि जवळपास ४० टक्‍के प्रौढांमध्ये पोटाचा लठ्ठपणा आहे, ज्यामुळे त्यांच्यात हा आजार वाढण्याचा धोका जास्त आहे. अनेक उपचारांचे पर्याय उपलब्ध असूनही अनियंत्रित टाईप २ डायबेटीस हे एक मोठे आव्हान बनले आहे. ओरल सेमाग्लुटाइड हे एक ग्लुकागन-लाइक पेप्टाइड-१ रिसेप्टर अॅगोनिस्ट (जीएलपी-१ आरए) आहे, जे टाईप २ डायबेटीस असलेल्या प्रौढांमधील रक्तातील साखरेचे नियंत्रण (ग्लायसेमिक कंट्रोल) सुधारण्यासाठी आहार आणि व्यायामाला पूरक म्हणून सुचवले जाते. हे एक सोयीस्कर आणि स्थिर पर्याय देऊ शकते, जे वेळेवर उपचार सुरू करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे उपचारांचे नियमित पालन सुधारते आणि दीर्घकालीन गुंतागुंतीचा धोका कमी करण्यास मदत होते.

डॉ. रेड्डीजचे ओबेडा (सेमाग्लुटाइड टॅब्लेट्स) हे सेमाग्लुटाइड अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटच्या (एपीआय) रिकॉम्बीनंट डीएनए स्रोताचा वापर करून तयार करण्‍यात आले आहे. भारतात टाईप २ डायबेटीस मेलिटस असलेल्या २८८ सहभाग्यांचा समावेश असलेल्या फेज ३ क्लिनिकल संशोधनाच्‍या पुनरावलोकनानंतर डॉ. रेड्डीजने सीडीएससीओकडून त्यांच्या ओरल सेमाग्लुटाइड बायोसिमिलरसाठी मान्यता मिळवली. या संशोधनाने मूळ औषधाच्या (इनोव्हेटर ओरल ड्रग) तुलनेत प्रभावीपणात कोणतीही कमतरता नसलेली आणि समकक्ष सुरक्षा वैशिष्ट्ये (सेफ्टी प्रोफाइल) प्रदर्शित केली. १२ आणि २४ आठवड्यांत ७ टक्क्यांपेक्षा कमी एचबीए१सी पातळी गाठणाऱ्या सहभाग्यांच्या प्रमाणावरून मोजल्यानुसार उपाशी पोटी आणि जेवणानंतरची प्लाझ्मा ग्लुकोज, वजन कमी होणे आणि एकंदरीत रक्तातील साखरेचे नियंत्रण यासाठी समान परिणाम दिसून आले. याव्यतिरिक्त, शरीरात कोणतीही अँटी-ड्रग अँटीबॉडीज आढळली नाही आणि याची इम्युनोजेनिसिटी प्रोफाइल मूळ औषधाशी सुसंगत होती.

डॉ. रेड्डीजचे ओबेडा (सेमाग्लुटाइड टॅब्लेट्स) ३ मिलीग्रॅम, ७ मिलीग्रॅम आणि १४ मिलीग्रॅम क्षमतेमध्ये उपलब्ध असून दररोज एकदा ओरल (तोंडावाटे) वापरासाठी सुचवले जाते. याची किंमत अनुक्रमे ३ मिलीग्रॅम, ७ मिलीग्रॅम आणि १४ मिलीग्रॅम डोससाठी प्रति टॅब्लेट ९९ रुपये, १३५ रुपये आणि २२५ रुपये आहे.

डॉ. रेड्डीजच्या ग्लोबल जेनेरिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. रामण म्हणाले, “मधुमेहाच्या रुग्णांसाठी आमच्या ओरल सेमाग्लुटाइडचे लाँच हे प्रगत मधुमेह काळजीची उपलब्धता वाढवण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्‍हाला माहित आहे की, मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णाचा प्रवास वेगळा असतो आणि उपचारांचे पर्याय त्या विविधतेनुसार असायला पाहिजे. या लाँचसह, आम्ही रुग्णांना अधिक पर्याय आणि स्थिरता देण्यासाठी आमच्या जीएलपी-१ पोर्टफोलिओचा विस्तार करत आहोत. हे उत्पादन इन-हाउस विकसित आणि तयार केले गेले असल्याने आम्ही भारतातील रुग्णांसाठी विश्वासार्ह पुरवठा आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता राखण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही एक सर्वसमावेशक जीएलपी-१ पोर्टफोलिओ तयार करणे सुरू ठेवत असताना आमचा भर नाविन्यता, उच्‍च गुणवत्ता आणि परवडणारे दर देण्यावर आहे, ज्याचे रूपांतर भारतातील आणि त्यापलीकडील क्रॉनिक मेटाबॉलिक आजारांसह जगणाऱ्या व्‍यक्तींसाठी महत्त्वपूर्ण उपचार पर्याय आणि चांगल्या दीर्घकालीन परिणामांमध्ये होईल.”

डॉ. रेड्डीजचे ओबेडा (सेमाग्लुटाइड टॅब्लेट्स) हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसह मिळणारे औषध आहे. रुग्णांना अधिक माहितीसाठी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो.

Comments are closed.