NGN News
Latest Marathi News

निलेश खैरे सांभाळणार नाशिक कॉंग्रेस शहराध्यक्षपदाची कमान

  • पक्षाकडून औपचारिक घोषणा; ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कहांडोळ, टाकेकर कायम

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : कॉंग्रेस शहराध्यक्षपदी निलेश ( बबलू ) खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेले अनेक महिने या पदावर प्रभारी असलेल्या शरद आहेर यांचे स्थान खैरे हे घेतील. पक्षाच्या उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रमेश कहांडोळ तर दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भारत टाकेकर यांना कायम ठेवण्यात आले आहे.

गेली ३५ वर्षे खैरे हे पक्षाचे काम निष्ठेने करत असल्याने त्याचे फळ त्यांना मिळाल्याचे मानले जात आहे. एनएसयुआय, युवक कॉंग्रेस या पक्ष संलग्न संघटनांच्या माध्यमातून खैरे यांनी विविध उपक्रम आणि आंदोलनांच्या माध्यमातून दखलपात्र कामगिरी केली आहे. याधीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्याऐवजी कोण चेहरा द्यावा, यावर एकमत होत नसल्याने प्रदेश उपाध्यक्षपदी असलेल्या शरद आहेर यांना प्रभारी शहराध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. त्यानंतर आता खैरे त्यांची जागा घेतील.

पक्षबांधणीचे मोठे आव्हान

गेल्या काही वर्षात नाशिक शहरातील कॉंग्रेस पक्ष संघटन खिळखिळे झाले आहे. अनेक नेते आणि पदाधिकारी यांनी इतर पक्षांची वाट धरली आहे. पक्षातील गटबाजी देखील जगजाहीर आहे. याच अनुषंगाने पक्षबांधणीचे आव्हान खैरे यांच्यासमोर असणार आहे.

Comments are closed.