NGN News
Latest Marathi News

नाशिक बाजार समितीला पुरेसा निधी देऊ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासकामांमध्ये कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही, तसेच निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सर्व संचालक उपस्थित होते.

भेटीदरम्यान मजूर सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासकामांबाबतही चर्चा झाली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. राज्यातील मजूर सहकारी चळवळीला अधिक बळ मिळावे आणि सर्वसामान्य मजुरांच्या हिताचे कार्य प्रभावीपणे पुढे जावे, यासाठी शासन स्तरावर सातत्याने सहकार्य राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांतर्फे आदरणीय सुनेत्रा पवार यांचे आभार मानण्यात आले.

Comments are closed.