
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगर जिल्हा अंतर्गत नवीन नाशिक मंडळाच्या महिला मोर्चाच्या कार्यकारिणीत डॉ. निलम किशोर परदेशी (खुटवड नगर) यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासोबतच केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य आणि पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी त्या कार्यरत राहणार आहेत.
या नियुक्तीबद्दल डॉ. निलम परदेशी यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वासह नवीन नाशिक मंडळाचे अध्यक्ष, महिला मोर्चाच्या पदाधिकारी तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांसाठी सदैव कार्यरत राहण्याचा निर्धार डॉ. निलम परदेशी यांनी व्यक्त केला.
Comments are closed.