NGN News
Latest Marathi News

एमआयएम नगरसेवक निघाला निदा खानचा आश्रयदाता

  • मतीन पटेल यास नाशिक पोलिसांची नोटीस; मोबाईल जप्तीची कारवाई

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील फरार मुख्य संशयित निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय देण्यासाठी स्थानिक एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यास नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईलही जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अनेक दिवसांपासून फरार असलेली निदा गेल्या पाच दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्याला होती. नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर तिने कुटुंबासह शहरात येण्याचा निर्णय घेतला.  पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन फ्लॅट विकत घेतला होता, जिथे निदा खानला ठेवण्यात आले होते. बलात्कार, धर्मांतर तसेच ॲट्रॉसिटी गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप करत पोलिसांनी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यालाही सहआरोपी केले आहे. या प्रकरणी मतीन पटेल यांच्या विरोधात नाशिकमध्ये बीएनएस कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पटेल यास नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईलही जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांकडून योग्य दिशेने पुढील तपास सुरू आहे.  

Comments are closed.