
- महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्यसूत्रधार असलेली संशयित आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिच्याकडून दोन स्मार्टफोन जप्त करण्यात आले असून त्यामधून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या २५ मार्चपासून फरार असलेली आणि पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. टीसीएस कंपनीतील महिला लैंगिक अत्याचारातील आरोपींना मदतीसह धर्मांतरासाठी निदा खान महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा आरोप आहे. निदा खानला अटक केल्यानंतर या प्रकरणात नियुक्त एसआयटी तपासाला आता गती मिळणार आहे. सोबतच टीसीएस प्रकरणात विदेशी फंडिंगसह, आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचाही संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी एसआयटीने एका महिला ऑपरेशन्स मॅनेजरसह आठ जणांना अटक केली आहे.
हे आहेत आरोप…
टीसीएस कंपनीतील छळ, धर्मांतर याप्रकरणात फिर्यादी पक्ष तथा एसआयटी आणि पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात धक्कादायक खुलासे केले. टीसीएसमधील एचआर निदा खानवर पीडितेला बुरखा, धार्मिक पुस्तके पुरवल्याचा आणि तिच्या मोबाईल फोनवर इस्लामी धार्मिक ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल केल्याचा आरोप आहे.
Comments are closed.