NGN News
Latest Marathi News

शिवानिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा पत्नीसह अपघाती मृत्यू

  • समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटरनेला कार मागून जोरात धडकली

** एनजीएन न्यूज नेटवर्क

सिन्नर : अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याचा अत्यंत जवळचा सहकारी आणि शिवानिका ट्रस्टचे संचालक, उपाध्यक्ष जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर – शिर्डी समृद्धी महामार्गावर धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटरनेला कार मागून जोरात धडकली. त्यामध्ये शेळके दाम्पत्य जागीच गतप्राण झाले. जखमी मुलाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

प्राप्त माहितीनुसार, शेळके हे आपल्या कुटुंबासह कारने प्रवास करत होते. धोत्रे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला असून जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. शेळके हे अशोक खरातचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. खरातच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. याशिवाय, शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरात याची भागीदारी असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके मोठ्या मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती समोर येत आहे.

तीन दिवसांपुर्वीच ईडीकडून चौकशी

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधत याप्रकरणी शंका उपस्थित केली. भोंदू खरात प्रकरणातला हा पहिला अपघात असून आता याची सुरुवात झाली. जितेंद्र शेळके यांचे सिल्व्हर ओक लॉंज मंगल कार्यालय होते. तीन दिवसांपुर्वी ईडीकडून चौकशी झाली होती. आज जर त्यांचा मृत्यू होत असेल तर हे खूप धक्कादायक आहे. दीपक लोंढे यांची चौकशी सुरु आहे, सचिन सुंभाले, बाळासाहेब बोऱ्हाडे या तिघांना सरकारकडून सुरक्षा दिली पाहिजे.  

Comments are closed.