
- नदी काठावरील पाच गावातील ग्रामस्थांचे आयुष प्रसाद यांना निवेदन
** पंडित पाठक
लोहोणेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
देवळा तालुक्यातील लोहोणेर, विठेवाडी, सावकी, खामखेडा, भऊर येथील गिरणा नदी पात्रातील वाळू घाटाचा लिलाव प्रक्रिया भविष्यात राबविण्यात येऊ नये या मागणीसाठी वरील ५ ही गावांतील शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रातील वाळू घाट प्रकल्प अथवा वाळू लिलाव प्रक्रिया पूर्ण झालेली असून, प्रशासनाकडून मंगळवार दि. ०७ एप्रिल रोजी संबंधित वाळू गटाचा ताबा महसूल विभागाच्या वतीने संबंधित ठेकेदारास देण्यात येणार होता. मात्र, यावेळी स्थानिक तसेच पंचक्रोशीतील लोहोणेर, विठेवाडी, सावकी, खामखेडा, भऊर येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित संबंधित ठेकेदारास ताबा घेऊ दिला नाही.
दरम्यान लोहोणेर येथील झालेली वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात यावी, तसेच पुढील काळात लोहोणेर, खामखेडा, सावकी, विठेवाडी व भऊर या गावांच्या हद्दीतील गिरणा नदीपात्रात कोणत्याही प्रकारचा वाळू घाट प्रकल्प अथवा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, या प्रमुख मागण्यांसाठी वरील पाचही गावांतील शिष्टमंडळाने आज नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व आपली भूमिका ठामपणे मांडली.
यावेळी विठेवाडीचे उपसरपंच ईश्वर निकम, विलास निकम, शशिकांत निकम, राजेंद्र निकम, माणिक निकम, विठोबा सोनवणे, दादाजी सोनवणे, खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच वैभव पवार, गणेश शेवाळे, अनुप शेवाळे, हेमंत मोरे, दादाजी सोज्वळ, सावकीचे उपसरपंच हेमंत पवार, अनिल शिवले, कारभारी पवार, आबा सोनवणे, जीभाऊ निकम, शेखर बोरसे, तसेच भऊर येथील माजी सरपंच दादा मोरे, काशिनाथ पवार,योगेश पवार, सुभाष पवार, संजय पवार, लोहोणेर येथील समाधान महाजन,योगेश पवार, किशोर अवस्थी आदींसह लोहोणेर विठेवाडी, सावकी, खामखेडा, भऊर गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.