NGN News
Latest Marathi News

प्रतिभा चाकणकर म्हणाल्या, समता पतसंस्थेत पायही ठेवलेला नाही

  • दिलेला पत्ताही चुकीचा असल्याचा दावा ; शिर्डी पोलिसांकडून आठ तास चौकशी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : समता पतसंस्थेत मी कधीही गेलेली नाही, माझ्या नावावरील खाते उघडताना पत्ता देखील चुकीचा वापरण्यात आला, असा थेट दावा संशयित खातेदार तथा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांनी केला.  भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी शिर्डी पोलिसांनी सोमवारी प्रतिभा चाकणकर यांची आठ तास चौकशी केली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे 4 खाती असल्याचं समोर आलंय. स्वत: प्रतिभांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती आहेत. या खात्यांवरुन 2 कोटींच्यावर आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याचा जबाब नोंदवण्यात आला. प्रतिभा चाकणकर म्हणाल्या, माझ्या नावाची खाती बनावट आहे. सह्या देखील नाही. मी एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बातम्या बघून आम्ही जबाब द्यायला आलो. शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही. कागदपत्रे आणि सह्या बनावट आहेत. याशिवाय, समता पतसंस्थेत मी कधीही गेलेली नाही, असा दावा त्यांनी केला.

@ प्रतिभा आणि तन्मय याच्या सह्यांचे नमुने पोलिसांना दिले. सर्व खातरजमा झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. चाकणकर पोलिसांना वेळोवेळी सहकार्य आणि तपासात मदत करतील. पोलिसांची चौकशी सुरू असून कायदेशीर कारवाई बाबत चर्चा करूनच निर्णय घेऊ…मात्र पतसंस्थेत खाते संदर्भात कोणतेही तत्थ नाही.

  • जयश्री काळे-पालवे, प्रतिभा चाकणकर यांच्या वकील

Comments are closed.