
- विविध क्षेत्रातील व्यक्तींचा ‘सब सोनेरी, एक लोहोणेरी‘ हया पुरस्काराने सन्मान
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लोहोणेर : पंडित पाठक
क्रांती ज्योती महात्मा फुले यांची जयंती लोहोणेर येथे महात्मा ज्योतीराव फुले युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लोहोणेर गावातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा ‘सब सोनेरी एक लोहोणेरी‘ हया पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रेश्मा महाजन या होत्या.
यावेळी इंजि. रमेश पाटील, लोहोणेर गावांतील भूमिपुत्र बापूसाहेब महाजन ,विठ्ठल बागुल, मेघराज परदेशी, संजय शेवाळे, शरद सोनवणे, बापूसाहेब शेवाळे, पंकज परदेशी, मधुकर शेवाळे, राजेंद्र आहिरे, सुनील एखंडे, पंडीत पाठक, विशाल देशमुख, राजेंद्र जाधव, समाधान चव्हाण, यांचे सह दिपक बच्छाव, प्रसाद देशमुख, रमेश आहिरे, रतीलाल परदेशी, धोंडू आहिरे, भाऊसाहेब गायकवाड, अविनाश महाजन, अरुण उशीरे, चंद्रकांत, रेश्मा महाजन, प्रतिभा सोनवणे, उषाबाई सोनवणे, छायाबाई कोठावदे, विमलबाई शेवाळे, ग्रामविकास अधिकारी संदीप खेबडे, कांतीलाल सोळंकी, मयुरी आहिरे, राकेश शेवाळे आदींचा सन्मान चिन्ह शाल व गुच्छ देऊन महात्मा ज्योती राव युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात करण्यात आला.
याप्रसंगी पांडुरंग शेवाळे, दिगंबर कोठावदे, वसंत शेवाळे, जीभाऊ बागुल, दादाजी महाजन, हरिभाऊ परदेशी, किशोर देशमुख, सिद्धार्थ पवार, हिरामण आहिरे,प्रवीण आहिरे, अध्यक्ष गोकुळ आहिरे,उपाध्यक्ष गोरख शेवाळे,संस्थापक अध्यक्ष सुनील महाजन,खजिनदार अमित बागुल, गणेश शेवाळे, पांडुरंग वाघ,धनराज जाधव, योगेश आहिरे, सतीश शेवाळे, मच्छिंद्र बागुल, सचिन आहिरे, रवींद्र बच्छाव,प्रवीण आहिरे, संदीप शेवाळे,चेतन महाजन, प्रदीप खैरनार, योगेश शेवाळे आदी उपस्थित होते. यावेळी रमेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर पंडीत शेवाळे यांनी आभार मानले. सायंकाळी ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमास ग्रामस्थ व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.