
- लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजनचा सेवाभावी उपक्रम
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कुत्तरमाळ या दुर्गम आदिवासी भागात लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजन व सेवा संकल्प समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्मशानभूमी शेडचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
कुत्तरमाळ परिसरात पावसाळा व उन्हाळ्यात अंत्यविधी करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गरज ओळखून लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजनने सेवा संकल्प समितीच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमी शेड उभारण्याचा निर्णय घेतला. क्लबच्या सदस्यांनी स्वतः निधी संकलन करून हा प्रकल्प पूर्णत्वास आणला आणि ग्रामस्थांच्या सेवेसाठी सुपूर्त केला. यावेळी फित कापून शेडचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला लायन जयंत येवला, लायन राजेंद्र कोठावदे, लायन रवींद्र सोनजे, लायन महेश पितृभक्त, लायन प्रवीण अमृतकर, लायन मनोज बागुल, लायन विलास निधुरे, लायन विनोद सोनजे यांच्यासह सेवा संकल्प समितीचे पदाधिकारी, लायन्स क्लबचे सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या प्रकल्पासाठी लायन भूषण कोठावदे, लायन रामचंद्र जोशी, लायन रवींद्र झोपे, लायन सचिन वाघमारे आणि लायन विनोद सोनजे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी लायन महेश पितृभक्त यांनी आभार प्रदर्शन केले.
Comments are closed.