
- लोहोणेर, विठेवाडी, खामखेडा, सावकी, भऊर येथील ग्रामस्थांचा प्रखर विरोध
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लोहोणेर : पंडित पाठक
देवळा तालुक्यातील लोहोणेर विठेवाडी येथील गिरणा नदी पात्रालगत असलेल्या ७गट नंबर मधील परस्पर झालेल्या वाळू ठिय्याचा ताबा घेण्यासाठी आलेल्या ठेकेदाराला लोहोणेर, विठेवाडी, खामखेडा, सावकी, भऊर येथील ग्रामस्थांनी प्रखर विरोध केल्याने कब्जा न घेता परत फिरावे लागले.
गिरणा नदी पात्रातील वाळू लिलावास गिरणा नदी काठावरील गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र विरोध व्यक्त केला आहे. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी देवळा यांचे आदेशानुसार लोहोणेर ( ता. देवळा जि. नाशिक ) येथील गिरणा नदीपात्रातील गट नं.९५५, ९५६, ९५७, ९५८, ९७१, ९७२, व ९७३ लगतच्या नदीपात्रातील उपलब्ध वाळू साठा१०९९८ब्रास वाळू साठा करणेसाठी ताबा देणे बाबत नाशिक जिल्हयाकरीता पर्यावरण अनुमती प्राप्त ०८ वाळू गटाकरीता वरील प्रमाणे वाळूगट निहाय ई-निविदा व ई-लिलाव जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर ई-निविदा व ई-लिलावामध्ये सुनंदाई बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे श्री. दिपक सुधाकर पाटील रा, जळगाव यांना मौजे लोहोणेर-१, ता. देवळा, जि. नाशिक येथील गिरणा नदीपात्रातील गट नंबर.९५५, ९५६, ९५७,९५८, ९७१, ९७२ व ९७३ लगतच्या नदीपात्रातील उपलब्ध वाळूसाठा १०९९८ ब्रास चे उत्खनन व वाळूसाठा करणेकामी परवाणगी देण्यात आलेली असून सदर वाळूसाठा करणेकामी आदेशात नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून ठेकाधारक यांना वाळूसाठा व वाहतुक करणेसाठी ताबा देणेकामी आपणास प्राधिकृत करण्यात येत आहे. सदर ताबा देणेकामी भूमि अभिलेख कार्यालयाकडील भूकर मापक यांनी आदेशात नमूद केलेप्रमाणे निश्चित केलेल्या गटांच्या हद्दी, खुनानुसार कार्यवाही करण्यात यावी.
तरी मौजे लोहणेर ता. देवळा येथील आदेशात नमूद नदीपात्रालगतच्या गटामध्ये मंगळवारी ( दि. ७ ) सकाळी प्रत्यक्ष जागवेर जावून ग्राम मंडळ महसूल अधिकारी व तलाठी यांचे सहाय्याने वाळु उत्खनन व वाळूसाठा करणेकामी ताबा देण्याची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असे आदेश डॉ. मिलिंद कुलकर्णी तहसिलदार देवळा यांना देण्यात आले होते. त्या नुसार मंडळ अधिकारी मनोहर गांगुर्डे व ग्राम महसूल अधिकारी विनायक राऊत (तलाठी) लोहोणेर तलाठी यांनी वर नमूद तारखेस मंडळ अधिकारी यांचे सूचनेप्रमाणे सदर कार्यवाहीमध्ये जागेवर उपस्थित राहून सहाय्य करावे. असे आदेशानुसार आज सकाळी संबंधित अधिकारी संबंधित ठेकेदार दीपक पाटील यांना कब्जा देणेसाठी नदी पात्रात गेले असता लोहोणेर, विठेवाडी, भऊर, खांमखेडा, सावकी या नदी काठावरील ग्रामस्थांनी एकत्र येत या गटातील वाळू उचलण्यास व संबंधित ठेकेदार दिपक पाटील (जळगाव) यास कब्जा देणे बाबत तीव्र विरोध दर्शविला व यापुढे कोणत्याही परिस्थितीत गिरणा नदी पात्रातील वाळू लिलाव कधीही होऊ नये व होऊ देणार नाही अशी कठोर भूमिका घेत संबंधित वाळू लिलावास तीव्र विरोध दर्शविला. या वाळू उपसा मुळे गिरणा नदी काठावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठया प्रमाणावर तीव्र होणार असल्याने व सिंचन विहीर प्रश्न,पेयजेल प्रश्न उदभवणार असल्याने वाळू लिलावास विरोध करण्यात येत आहे.
याप्रसंगी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी गांगुर्डे, तलाठी पवार, आदी उपस्थित होते. यावेळी सदर लिलावाला विरोध करण्यासाठी लोहोणेर येथील दिपक बच्छाव, प्रसाद देशमुख, रमेश अहिरे,सतीश देशमुख, अनिल आहेर, योगेश पवार, समाधान महाजन, सोपान सोनवणे, विठेवाडी येथील पंडितराव निकम, विलास निकम, शशिकांत निकम, विठोबा सोनवणे, माणिक निकम, शंकर निकम,पी. डी. निकम, तानाजी निकम, पुंडलिक निकम,दादाजी सोनवणे,कमलेश आहेर, रावसाहेब निकम, सुभाष निकम, प्रवीण निकम,खामखेडा येथील सरपंच वैभव पवार, गणेश शेवाळे, सावकी येथील उपसरपंच हेमंत पवार, कारभारी पवार, अनिल शिवले,बापू बोरसे, शेखर बोरसे भऊरचे दादा मोरे, काशिनाथ पवार, संजय पवार आदींसह लोहणेर, विठेवाडी, सावकी,खामखेडा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संबंधित ग्रामस्थांनी अंत्यत तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
Comments are closed.