
- दोन दिवसांच्या चौकशीनंतर सोडले होते घरी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना संशयित आरोपी असताना ती फरार आहे. अशातच एसआयटीने दोन दिवस कसून चौकशी करून घरी सोडण्यात आलेला खरातपुत्र हर्षवर्धन देखील नॉट रिचेबल असल्याचे स्पष्ट झाले आहे. हर्षवर्धन हा चौकशी टाळण्यासाठी गायब झाला का, याबाबतीत आता तपास यंत्रणांकडून शंका उपस्थित केली जात आहे.
भोंदू खरातच्या मुलाची याआधी दोन दिवस चौकशी करण्यात आली होती. त्यांनतर त्याला घरी सोडण्यात आले होते. तथापि, चौकशीनंतर खरातच्या मुलाचा फोन नॉट रीचेबल येत असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन खरातचा मोबाईल बंद असल्याने तपास यंत्रणांनी खरातच्या निवासस्थानी शोध घेतला असता मुलगा तेथे मिळून आला नाही. या घटनेने तपास यंत्रणा सतर्क झाली आहे. कारण आई पाठोपाठ मुलगा फरार झाल्याने त्यांचा शोध घेणे आता जिकरीचे होणार आहे. हर्षवर्धन हा नाशिक शहरात आहे की शहराबाहेर या दिशेने देखील तपास सुरु करण्यात आला आहे.
Comments are closed.