
- महाराष्ट्रातील गुणीजनांना राज्यस्तरीय सक्षमरत्न पुरस्कार प्रदान
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्रातील नावाजलेले वृत्तपत्र सक्षम पोलिस टाइम्सने हनुमान जयंतीला १२ व्या वर्षात दिमाखात पदार्पण केले.
गुरुवार दि. २एप्रिल २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी बाबाजी, मुख्य संपादक विलास पाटील, निवासी संपादक मनोहर आहिरे, नगरसेविका कविताताई अमोल नाईक ,अखिल भारतीय सक्षम मिडिया फाउंडेशनच्या महिला प्रदेशाध्यक्ष, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब चौधरी पाटील, उपमहापौर विलास शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आरंभी मंत्रघोषात दीप प्रज्वलन आणि श्री हनुमान प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर अतिथी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि भूमिका मुख्य संपादक विलास पाटील यांनी विषद केली. यावेळी त्यांनी सक्षम पोलिस टाइम्सच्या ११ वर्षाच्या प्रवासाचा लेखाजोखा श्रोत्यांसमोर ठेवला. यात वर्धापनदिन, पत्रकारदिन, जागतिक महिलादिनानिमित्त विविध क्षेत्रातील गुणीजन सन्मान करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. त्याचप्रमाणे अखिल भारतीय सक्षम मिडिया फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी, भविष्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा ऊहापोह केला.
प्रमुख अतिथी योगी बाबाजी यांनी आशीर्वाद देताना सक्षम पोलिस टाइम्स आणि मुख्य संपादक विलास पाटील यांचे कौतुक केले. ११ वर्षे एखादे प्रसारमाध्यम चालविणे अवघड आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच आजच्या अराजकतेच्या काळात प्रत्येक व्यक्तीने थोडा वेळ काढून अध्यात्मात घालविणे, माणुसकीच्या संस्कृतीचे रक्षण करणे आदी अपेक्षा व्यक्त केल्या. फाउंडेशनच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ.शैला शिंदे ( पंढरपूर ) यांनी संघटनेच्या माध्यमातून महिला संघटन आणि सक्षमीकरण यावर भर देणार असल्याचे सांगितले. तसेच आजच्या घडीला सर्वांचा पोशिंदा असलेला बळीराजा अर्थात शेतकरी अनेक संकटांचा सामना करीत असल्याचे देखिल नमूद केले.
यावेळी अनेक सत्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या येतोच सन्मान करण्यात आला पुढील प्रमाणे :
1) पूजा माई नंदगिरी श्री 1008 महामंडलेश्वर आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा अध्यात्मिक क्षेत्र
2) श्री शंकर मोठा भाऊ भामरे सामाजिक क्षेत्र 3) श्री रामदास कुंदे कलाक्षेत्र क्षेत्र 4) डॉ मनीषा वाघ वैद्यकीय क्षेत्र 5) श्री रमेश पाटील पत्रकार क्षेत्र 6) प्रदीप अहिरे कला शिक्षक क्षेत्र 7) डॉ अनिल धनगर आरोग्य व सामाजिक क्षेत्र 8) श्रीमती संगीता जगताप नाईक शैक्षणिक क्षेत्र 8) डॉ चंदा वानखेडे नागपूर वैद्यकीय क्षेत्र9) श्री प्रशांत राऊत उद्योग क्षेत्र नागपूर 10) महेंद्र मुरलीधर डोईजड समाजकारण व सहकार क्षेत्र11) किशोर शेठ नागपूर इमिटेशन ज्वेलरी उद्योग क्षेत्र 13) योगेश लक्ष्मण तिडके राजकीय क्षेत्र 14) पोपटराव पवार राजकीय क्षेत्र 15) सुदाम गांगुर्डे उद्योग व्यवसाय क्षेत्र 16) वेदमूर्ती शुभम पांडेय अध्यात्मिक क्षेत्र 17) अशोक देवरे सामाजिक क्षेत्र 18) संतोष घावट लाकडी मूर्ती कलाकार क्षेत्र 19) साहेबराव देशमुख रिअल इस्टेट बांधकाम क्षेत्र 20) संकेत सानप आरोग्य मदत सेवा क्षेत्र 21) राजाभाऊ भोतमांगे 22) सौ आशु रवी गवळी मेकअप आर्टिट क्षेत्र 23) प्राध्यापक वामन शेडमाके शिक्षण क्षेत्र कार्य कुशल धुरंदर पुरस्कार सक्षम पोलीस टाइम्स प्रतिनिधींना 1) नित्यानंद पाटील उपसंपादक ठाणे/ पालघर 2 संजय मेरे उपसंपादक विदर्भ,नागपूर 3) डॉ तुकाराम गवळी सहसंपादक कसमादे 4) संतोष कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड
यावेळी महाराष्ट्रभरातून मा. निवासी संपादक कु ज्योती रामोळे, संजय मिरे उपसंपादक विदर्भ डॉ तुकाराम गवळी सहसंपादक नित्यानंद पाटील उप संपादक, सुनील झा राष्ट्रीय चीप ब्युरो, सुनील निकम कार्यकारी संपादक, संजय दोंदे उपसंपादक, महेंद्र पाटील उपसंपादक, प्रवीण पवार उपसंपादक, अस्मिता वानखेडे उपसंपादक, महेंद्र चौधरी उत्तर महाराष्ट्र सहसंपादक उत्तर महाराष्ट्र कार्यकारी संपादक विवेक कडवे अमर जिजुर्डे अहिल्यानगर जिल्हाप्रतिनिधी, श्रीकांत झिंजुर्डे संभाजीनगर प्रतिनिधी जावेद पिंजारी धुळे जिल्हा प्रतिनिधी मुख्य फोटोग्राफर प्रताप पाटील, साजिद शेख शहादा प्रतिनिधी सचिन वरसाळे नवापूर डॉ. विलास पवार विद्यापीठ प्रतिनिधी प्रतिनिधी जॅक भाई भिसे बांद्रा अंधेरी प्रतिनिधी योगेश कर्डिले निफाड प्रतिनिधी, मंजूम पठाण दोंडाईचा प्रतिनिधी, प्रतीक पवार कन्नड प्रतिनिधी सिडकोचे अविनाश येवले, न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील तसेच देशदूचे उपसंपादक नरेंद्र जोशी तसेच आमचे मित्र प्रमोद सोनवणे बी सेवेन वृत्तवाहिनी चे संचालक अमर सोळंकी प्रमोद पाटील, अशोका हॉस्पिटल,कॅन्सर सेल च्या सीईओ श्रीमती मनीषा चौधरी रवींद्र मोरे दर्शन कोठारी व पदाधिकारी उपस्थित होते.
ऐन कार्यक्रमाच्यावेळी अवकाळी पावसाने नाशिक शहरात जोरदार हजेरी लावल्याने कार्यक्रम काहीसा उशिरा सुरू झाला. मात्र सभागृह तुडुंब भरले होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन निवासी संपादक मनोहर आहिरे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष योगेश घोलप, व्यवस्थापिका कु. शेजल मगरे, संतोष चौधरी, पंकज पिंगळे, जयश्री पिंगळे, गणेश कातोरे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. ललिता कातोरे आदींनी परिश्रम घेतले. रवी शेट्टी प्रस्तुत संगीत रजनी आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments are closed.