
- हर्षल पाटणकर आणि त्याचे सहा साथीदार कारवाईच्या परिघात
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहराच्या गुन्हे विश्वात परिचित असलेल्या पाटणकर टोळीवर अखेर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. हर्षल पाटणकर आणि त्याचे सहा साथीदार कारवाईच्या परिघात आले असून गोळीबारासह वाहन तोडफोड, हत्येचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे वगैरे गुन्हे या टोळीच्या नावावर आहेत.
तब्बल एक वर्ष फरार असलेला हर्षल पाटणकर अलीकडे पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याच्याविरोधात शहरातील अंबड पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. आर्थिक लाभासाठी पाटणकर याने गुन्हे विश्वातील काही जणांसोबत संगनमत करून गुन्हे घडवल्याचे सिद्ध झाले आहे. मध्यंतरी त्याला काही काळ तडीपारही करण्यात आले होते.
मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यांमध्ये हर्षल पाटणकर, महेश गोकुळ, श्रावण पगारे, मयूर निकम, निखील जाधव, प्रदीप शेवाळे यांचा समावेश आहे. पाटणकर टोळीवर झालेल्या कारवाईमुळे नाशिकच्या गुन्हेविश्वाळा चांगलाच हादरा बसला आहे.
Comments are closed.