
- लग्नाचे आमिष दाखवून खरातचा घटस्फोटित महिलेवर अत्याचार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून शहरातील तीन ते चार डॉक्टरांची चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची एसआयटीकडून चौकशी झाली. यावेळी अशोक खरातने याच डॉक्टरांकडून सल्ला घेऊन ओशनो जलच्या नावाखाली गुंगी येणाऱ्या औषधे, वेदनाशामक गोळ्या महिलांना दिल्याची माहिती समोर आली आहे. खरातने लैंगिक अत्याचार केल्याने गर्भवती राहिलेल्या एका महिलेला ‘ओकस’ कार्यालयामध्ये गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या.
सध्या अशोक खरातची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान, काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजाविधीच्या बहाण्याने तसेच लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहासाठी स्थळ आलेली पीडित महिला आई-वडिलांसोबत पहिल्यांदा 2013 मध्ये अशोक खरातकडे गेले होते. त्याने सुखाचा संसार होईल असे सांगत इशानेश्वर मंदिरात जाऊन पूजा करण्यासाठी सांगितले. महिलेला दोन अपत्य होवूनही घरगुती भांडणे टोकाला गेल्याने पतिपत्नी विभक्त झाले. त्यानंतर पुन्हा पीडित महिला आई-वडिलांसोबत खरातकडे भविष्यबाबत मार्गदर्शन ऐकण्यासाठी गेले. तेव्हापासून नराधमाने महिलेवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली. पुढच्या वेळी महिला अशोक खरातकडे गेली असता त्याने लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर महिला स्पर्धा परीक्षाच्या तयारीसाठी दिल्लीला गेली. मात्र मुलांच्या भविष्याच्या काळजीमुळे पुन्हा नाशिकला परतली. पुन्हा खरातचे मार्गदर्शन घेण्यासाठी गेली असता त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरवात केली. तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून अत्याचार केले.
तू मागील जन्माची अप्सरा
तुझा घटस्फोट लिखित होता. तू मागील जन्माची अप्सरा आहे. मी अवतारी पुरूष आहे. माझे दोन विवाह होणार आहेत, दुसरा विवाह तुझ्याशी होणार असे सांगून खरात याने पीडितेवर अत्याचार केले. महिला प्रेग्नंट राहिल्याने अशोक खरातने गर्भपातच्या गोळ्या खाऊ घालून महिलेचा गर्भपात केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.