
- दुसऱ्या गुन्हासाठी उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. स्वाभाविकच खरातच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसऱ्या गुन्हासाठी त्याला पुन्हा एकदा उद्या ( दि. २ ) न्यायालयात हजर केले जाणार आहे. या दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्याला काय शिक्षा दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
गेल्या २९ मार्च रोजी खरातला कोर्टात हजर केल्यानंतर खरातची १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढविली होती. खरात तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आले. खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाला असून त्यात राजकीय व्यक्तींची नावे दुसऱ्याच्या नावाने सेव्ह केल्याचा संशय आहे. आज मात्र कोर्टाने पोलीस कोठडी न देता न्यायालयीन १४ दिवसांची कोठडी दिली आहे. त्यामुळे खरातच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चाही रंगली आहे. आज कोर्टातील सुनावणी अवघ्या ७ मिनिटात पूर्ण झाली. आज कोणताही मोठा युक्तिवाद झाला नाही. अशोक खरातला यापूर्वी तीन वेळेस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आजच्या सुनावणीत त्याला न्यायलयीन कोठडी मिळणार असल्याचे म्हटले जात होते. खरातविरोधात इतरही गुन्हे दाखल आहेत. उद्या गुरुवारी, २ एप्रिल रोजी त्याला इतर दुसऱ्या गुन्ह्यात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडी मिळावी असा प्रयत्न एसआयटीकडून करण्यात येणार आहे.
Comments are closed.