NGN News
Latest Marathi News

शिवसेना ( उबाठा ) नाशिक जिल्हा संपर्क उपनेतेपदी मिर्लेकर

  • उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये नियुक्ती; संघटना पुनर्बांधणीचे आव्हान

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शिवसेना ( उबाठा ) नाशिक जिल्हा संपर्क उपनेतेपदी रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये सदर नियुक्ती करण्यात आली आहे.

याआधी या पदावर असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. मिर्लेकर हे ‘मातोश्री’च्या खास मर्जीतील नेते मानले जातात. याआधी देखील त्यांनी नाशिकचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी पेलली आहे. पक्ष प्रवक्ते खा. संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते आहेत. त्यांच्यानंतर मिर्लेकर यांचे पद महत्वाचे असणार आहे. गेल्या काही काळात नाशिक जिल्हा शिवसेनेत मोठी पडझड झाली असून अनेक बडे नेते आणि पदाधिकारी पक्षातून बाहेर गेले आहेत, त्या पार्श्वभूमीवर रवींद्र मिर्लेकर यांच्या खांद्यावर नाशिक जिल्हा संपर्क उपनेते पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पक्ष संघटना बळकटीसाठी ते नेमकी कोणती पावले उचलतात, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहणार आहे.

Comments are closed.