
- क्रिकेट स्टार अभिषेक शर्मा जिलेटच्या नव्या उत्पादनासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त
- ‘बडे लीग का शेव्ह’ या मोहिमेत प्रमुख भूमिकेत दिसणार
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
तरुण भारतीय पुरुषांना उत्तम ग्रूमिंग सुविधा देण्यासाठी,जिलेट इंडियाने अभिषेक शर्मा यांच्या सहकार्याने नवीन जिलेट गार्ड 3-इन-1 सादर केले आहे.हे व्हॅल्यू सेगमेंटमधील एक प्रगत आणि अत्यंत कार्यक्षम प्रोडक्ट असून, ते विशेषतः भारतीय ग्राहकांसाठी डिझाइन केले आहे. अभिषेक शर्मा या उत्पादनाचे ब्रँड अँबेसेडर असून, ते ‘बडे लीग का शेव्ह’ मोहिमेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही मोहीम नव्या पिढीच्या तरुणांना केवळ शेव्हिंगपुरते मर्यादित न राहता, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि उत्कृष्ट ग्रूमिंग अनुभव घेण्यासाठी प्रेरित करते.
जिलेट गार्ड 3-इन-1 हे आजच्या तरुणांच्या अपेक्षा लक्षात घेऊन तयार केलेले प्रोडक्ट आहे. आजची तरुण पिढी फक्त साध्या पर्यायांवर थांबत नाही, तर ती अधिक प्रगत, आरामदायी आणि प्रभावी ग्रूमिंग अनुभव शोधते. क्रिकेट स्टार अभिषेक शर्मा यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत हे प्रोडक्ट प्रगतीचे प्रतीक म्हणून सादर केले आहे. तसेच जिलेट गार्ड 3-इन-1 हे प्रोडक्ट ग्राहकांना अधिक आत्मविश्वास देते आणि आयुष्यातील महत्वाच्या क्षणांसाठी त्यांना ‘मॅच-रेडी’ राहण्यास मदत करते. जिलेट गार्ड 3-इन-1 मध्ये 3 प्लॅटिनम-कोटेड ब्लेड्स, न घसरणारी रबर ग्रिप हँडल आणि ॲक्वाजेल लुब्रास्ट्रिप आहे. ज्यामुळे शेव्हिंग स्मूथ होते आणि त्वचेवर कोणतीही जळजळ होत नाही.हे प्रोडक्ट त्याच्या वचनाप्रमाणे काम करते – “एका स्ट्रोकमध्ये स्मूथ शेव्ह, कोणताही त्रास किंवा जळजळ होत नाही.”
भारताच्या उदयोन्मुख युवा क्रिकेटपटूंपैकी एक असलेला अभिषेक शर्मा, सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो, ज्यामुळे तो या मोहिमेसाठी एक योग्य निवड ठरतो. आपले मत व्यक्त करताना अभिषेक म्हणाला, “आज प्रत्येक तरुण खेळ, करिअर किंवा जीवनात पुढच्या स्तरावर पोहोचण्यासाठी मेहनत करत आहे. माझ्यासाठी, ग्रूमिंग महत्त्वाची आहे कारण ती आत्मविश्वास वाढवते आणि मला ‘मॅचसाठी तयार’ दिसण्यास मदत करते. जिलेट गार्ड 3-इन-1 खूप खास आहे, कारण ते कापण्याची किंवा जळजळ होण्याची चिंता न करता, एकाच स्ट्रोकमध्ये स्मूथ शेव्ह देते. हा निश्चितच पुढे जाण्याचा एक मार्ग आहे आणि ‘बडे लीग का शेव्ह’ हाच त्याचा अर्थ आहे.”
लॉन्चबद्दल बोलताना कपिल शर्मा, व्हाइस प्रेसिडेंट आणि ग्रूमिंग कॅटेगरी हेड, जिलेट इंडिया म्हणाले, “जिलेट गार्ड 3-इन-1 च्या माध्यमातून आम्ही लाखो तरुणांना केवळ बेसिक ग्रूमिंगपुरते मर्यादित न राहता, प्रगत ग्रूमिंगचा अनुभव घेण्याची संधी देत आहोत. खास भारतीय ग्राहकांसाठी डिझाइन केलेले हे प्रोडक्ट परवडणाऱ्या किमतीत 3-ब्लेड शेव्हिंगचा उत्तम अनुभव देते, ज्यामुळे संपूर्ण भारतातील अनेक ग्राहक कापणे किंवा जखम होण्याची चिंता न करता स्मूथ आणि जवळून शेव्ह करू शकतात. अभिषेक शर्मा यांच्यासोबतची आमची भागीदारी आजच्या तरुणांची मानसिकता दाखवते, जो महत्त्वाकांक्षी आहे, सतत प्रगती करत आहे आणि मोठ्या स्पर्धेत उतरण्यास नेहमी तयार आहे.”
ही मोहीम मोठ्या प्रमाणावर 360-डिग्री पद्धतीने राबवली जाणार आहे. यामध्ये अभिषेक शर्माची डिजिटल फिल्म (डीव्हीसी) तसेच विविध ऑन-ग्राउंड अनुभवात्मक उपक्रमांचा समावेश असेल.
डीव्हीसी पाहण्यासाठी लिंक: https://youtu.be/mT8xUp8b6JM
जिलेट गार्ड 3-इन-1 ची मुख्य वैशिष्ट्ये:
● 3 प्लॅटिनम-कोटेड ब्लेड्स – कमी स्ट्रोकमध्ये जवळून आणि स्मूथ शेव्हिंग अनुभव
● अॅक्वाजेल ल्युब्रास्ट्रिप – अधिक आरामदायक शेव्ह आणि कमी जळजळ
● मजबूत रबर ग्रिप हँडल – अचूक शेव्हिंगसाठी उत्तम कंट्रोल
● 40-डिग्री फ्लेक्सी हेड – सहज हालचाल आणि सुरक्षित शेव्हिंग
या लॉन्चद्वारे जिलेट इंडिया भारतातील शेव्हिंग कॅटेगरीमध्ये पुढाकार घेत आहे. जिलेट गार्ड 3-इन-1 हे प्रोडक्ट तरुणांना शेव्हिंगपुरते मर्यादित न राहता, त्यांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व वाढवण्यासाठी देखील मदत करते.
जिलेट गार्ड 3-इन-1 आता देशभरातील रिटेल स्टोअर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
डिस्क्लेमर: “एक स्ट्रोकमध्ये स्मूथ शेव्ह,न कापता,न जळजळ होता.”(जिलेट डबल एजच्या तुलनेत प्रत्यक्ष परिणाम वेगवेगळे असू शकतात.)
Comments are closed.