NGN News
Latest Marathi News

मलिकला क्लीन चीट दिलेल्या चाकणकर यांच्या मुलास चित्रपटात काम

सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप; राजकीय नेत्यांसोबतचे फोटो दाखवले

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मी टू चळवळ सुरू असताना गायक, दिग्दर्शक अनु मलिकला क्लीन चीट दिल्यामुळेच त्यांच्या मुलाला चित्रपटात काम मिळाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. मलिक यांच्याविरोधात महिलांनी तक्रार केली होती. त्यांना पाठीशी घालण्यात आल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे यांनी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली. त्यानंतर, माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी अंधारे यांनी विविध राजकीय नेत्यांसोबतचे फोटो दाखवले. यावेळी अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर यांनी गायक, दिग्दर्शक अनु मलिकला मी टू प्रकरणी क्लीन चीन दिल्यामुळेच त्यांच्या मुलाला चित्रपटात काम मिळाल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटले. अंधारेंनी पत्रकार परिषदेत अशोक खरातचे काही फोटो दाखवले. त्यामध्ये माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर तसेच रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबत जास्त फोटो आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजप नेते अतुल सावे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचेही अशोक खरातसोबतचे फोटो दाखवले.

अंधारे म्हणाल्या, मी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहे, दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे फोन रेकॉर्ड, अर्थिक खाते चेक करावे. मी यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेला भेटणार आहे. चौधरी जे तटकरेसोबत अनेक व्यवहारात आहेत, ते कोकणात चाकणकर यांच्यासोबत आहेत. साडेचारशे, पाचशे कोटींचा प्रोजेक्ट आहे, येवढी ताकद येते कुठून, असा सवाल अंधारे यांनी विचारला. तसेच, मी टू चळवळ सुरू असताना गायक आणि दिग्दर्शक अनु मलिक यांच्याविरोधात महिलांनी तक्रार केली होती. त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी अनु मलिकला क्लीन चिट दिली होती, त्यामुळेच सोहम चाकणकर याला अनु मलिकांच्या फिल्ममध्ये काम मिळले होते, सोहम हा रुपाली चाकणकर यांचा मुलगा आहे, असेही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. 

Comments are closed.