NGN News
Latest Marathi News

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन; विरोधकांचा धिक्कार

  • नाशिक पश्चिमच्या जिल्हाप्रमुख अस्मिता देशमाने यांच्याकडून विरोधकांवर टीकास्त्र

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शिवसेना महिला आघाडी नाशिक पश्चिमच्या वतीने शनिवारी मुंबई नाका परिसरात तीव्र आंदोलन करण्यात येवून लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या ‘नारी शक्ती वंदन विधेयका’ ला काँग्रेससह इंडिया आघाडीचा धिक्कार करण्यात आला .

ऐतिहासिक महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताअभावी नामंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मते पडलीत. वस्तुतः, या विधेयकामुळे लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के जागांचे आरक्षण मिळणार होते. मात्र, विरोधी इंडिया आघाडीने विरोधात भूमिका घेतल्याने विधेयक फेटाळले गेले. त्यामध्ये काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांचा समावेश होता. केवळ राजकीय दृष्टीने बघून विरोधकांनी आपण किती कोत्या विचार बुद्धिचे आहोत, हे विरोधकांनी दाखवून दिले. नारीशक्तीला वेगळी दिशा देण्यासाठी झालेला हा प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडला, असा घणाघात करीत नाशिक पश्चिमच्या जिल्हाप्रमुख अस्मिता देशमाने यांनी विरोधकांचा तीर्व शब्दांत निषेध केला. आमचा पक्ष विरोधकांचा धिक्कार करतो.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महिला सक्षमीकरणाचा नेहमीच पुरस्कार केला आहे. मात्र आताच्या या ऐतिहासिक निर्णयाला विरोध करणे म्हणजे महिलांच्या हक्कांवर गदा आणण्यासारखे आहे, अशी टीकाही देशमाने यांनी केली.

याप्रसंगी नाशिक पश्चिमच्या महानगरप्रमुख शिल्पा चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुलोचना मोहिते, उपजिल्हाप्रमुख ज्योती फड, उपमहानगर प्रमुख मोनिका मुथा, प्रभाग प्रमुख मंगला पाटील, शाखाप्रमुख अनिता वाघ, शाहीन अन्सारी, सीमंतिनी जोरवेकर आणि नासिक पश्चिमच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..

Comments are closed.