
- रीडू आणि कार्डियाक ट्युमर सारख्या क्लिष्ट शस्रक्रियांचा समावेश; योजनेंतर्गत मोफत उपचार
नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क
हृदयविकार हा शब्द उच्चारताच सर्वसामान्य रुग्णांच्या मनात मोठी भीती निर्माण होते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान आणि निष्णात वैद्यकीय हातांच्या जोडीमुळे आता अशक्य वाटणाऱ्या हृदयशस्रक्रियाही यशस्वी होत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील हृदयविकार उपचारांत डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील एसएमबीटी (SMBT) हृदयविकार शस्रक्रिया विभाग एक मोठा आशेचा किरण ठरला आहे. गेल्या १० वर्षांच्या प्रवासात तब्बल ४ हजार ८६९ हृदय शस्रक्रियांचा यशस्वी टप्पा पूर्ण करून या विभागाने वैद्यकीय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत असलेल्या या विभागात केवळ नाशिकच नव्हे, तर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रेफर केलेले अत्यंत जटील रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. सर्वात प्रगत आणि अद्यायवत तंत्रज्ञानाचा वापर करून शस्रक्रिया केल्या जात असल्याचे डॉ सिन्हा यांनी सांगितले.
या विभागाचे प्रमुख आणि प्रख्यात हृदयविकार शस्रक्रिया तज्ज्ञ डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दशकात १ हजार ४८० बायपास सर्जरी (CABG) यशस्वीरीत्या पार पडल्या. तसेच हृदयाच्या झडपांशी संबंधित १ हजार २६१ वॉल्व्ह रिप्लेसमेंट आणि रिपेअर शस्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हृदयाच्या गुंतागुंतीच्या आजारांवरील उपचारात हा विभाग अग्रस्थानी असून, यात ६२ ‘री-डू’ (दुसऱ्यांदा होणाऱ्या) कार्डियाक सर्जरी आणि ४७ कार्डियाक ट्युमर (हृदयातील गाठी) वरील अत्यंत जोखमीच्या शस्रक्रियांचा समावेश आहे. यासोबतच रक्तवाहिन्यांशी संबंधित ‘व्हॅस्क्युलर सर्जरी’मध्येही विभागाने मोठे यश मिळवले आहे.
शस्रक्रिया यशस्वी होण्यामध्ये तंत्रज्ञानाइतकाच वाटा त्यानंतरच्या शुश्रूषेचा असतो. या विभागात हृदयविकार रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी नर्सिंग स्टाफ २४ तास उपलब्ध आहे. शस्रक्रियेनंतर रुग्णाची होणारी रिकव्हरी ही पूर्णतः ‘पोस्ट ऑपरेटिव्ह केअर’वर अवलंबून असते. येथील स्टाफच्या तत्परतेमुळे आणि आत्मीयतेमुळे रुग्ण अत्यंत वेगाने बरे होऊन आपल्या घरी परतत आहेत. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टरांचा प्रदीर्घ अनुभव आणि शासकीय योजनांची जोड यामुळे हा विभाग आज उत्तर महाराष्ट्रातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधारवड ठरला आहे.
चिमुकल्यांच्या काळजाची विशेष काळजी
हृदयात छिद्र असणे किंवा जन्मतः हृदयाचे दोष असणाऱ्या चिमुकल्यांसाठी हा विभाग संजीवनी ठरला आहे. गेल्या १० वर्षांत १ हजार १५५ बाल हृदय शस्रक्रिया (Congenital Cardiac Surgeries) येथे यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. अत्यंत लहान वयातील मुलांवर ओपन हार्ट सर्जरी करण्याचे मोठे आव्हान डॉ. सिन्हा आणि त्यांच्या टीमने लीलया पेलले असून, यामुळे शेकडो कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा एकदा हास्य फुलले आहे. यासोबतच दर महिन्याच्या अखेरच्या शनिवारी आणि रविवारी जन्मजात हृदविकार असलेल्या ३० ते ३५ बालकांवर डिव्हाईस क्लोजर हृदयविकार प्रक्रियादेखील केली जाते.
पिन-होल (MICS) सर्जरी: रुग्णांसाठी वरदान
गेल्या सहा महिन्यात ९२ मिनिमली इन्व्हेसिव्ह म्हणजेच ‘पिन-होल’ सर्जरी करण्यात आल्या आहेत. यामध्ये बायपास, वॉल्व्ह रिप्लेसमेंट आणि काही जन्मजात लहान मुलांचे हृदयविकार समाविष्ट आहेत. अशा प्रकारच्या उपचारांत छातीवर मोठी चीर देण्याची गरज नसते, त्यामुळे शरीरावर शस्त्रक्रियेचे विद्रूप डाग राहत नाहीत. रक्तस्त्राव कमी होतो, संसर्गाचा धोका टळतो तसेच रुग्ण अवघ्या काही दिवसांतच हालचाल करून पुन्हा आपल्या कामावर रूजू होऊ शकतो. विशेषतः बालक व अविवाहित तरुणी यांच्यासाठी पिन-होल सर्जरी वरदानच ठरली आहे.
डॉ. विद्युतकुमार सिन्हा, हृदयविकार शस्रक्रिया तज्ञ
एसएमबीटी हॉस्पिटल
हृदयविकारावर अत्याधुनिक उपचार
संपूर्ण हृदयविकार उपचार एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली उपलब्ध आहेत. यात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मार्गदर्शन मोफत केले जाते. तसेच हृदयविकाराची लक्षणे असलेल्या रुग्णांवर ईसीजी, ४-डी इको, स्ट्रेस टेस्ट केल्या जातात. तसेच याठिकाणी अल्ट्रा मोद्युलर कॅथलॅब आणि सुसज्ज कार्डियाक ओटीचा समावेश आहे. तसेच, हृदयाच्या गुंतागुंतीच्या समस्यांसाठी रोटा आणि आयव्हीयूएस सारखी उपकरणेही याठिकाणी उपलब्ध आहेत. याद्वारे बायपास होऊ न शकणाऱ्या रुग्णांवर तसेच बायपासची भीती असलेल्या रुग्णांवर कॉम्प्लेक्स अन्जिओप्लास्टी करणे शक्य झाले आहे.
डॉ. गौरव वर्मा
संचालक, एसएमबीटी हार्ट इन्स्टिटयूट
शासकीय योजनेतून मोफत उपचार
एसएमबीटी व्यवस्थापनाने नेहमीच रुग्णसेवेला प्राधान्य दिले आहे. याठिकाणी होणाऱ्या बहुतांश हृदयशस्रक्रिया ‘आयुष्मान भारत’ प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांतर्गत पूर्णपणे मोफत केल्या जातात. आर्थिक परिस्थितीअभावी कोणाचेही उपचार थांबू नयेत, ही व्यवस्थापनाची भूमिका असून, योजनेत न बसणाऱ्या शस्रक्रियांसाठी ऑपरेशन चार्जेस, डॉक्टर चार्जेस, भूलतज्ञ चार्जेस, नर्सिंग चार्जेस, जेवण सर्व मोफत करण्यात आले असून केवळ औषधांच्या खर्चात हजारो रुग्णांवर आजवर उपचार करण्यात आले आहेत.
–सचिन बोरसे, संचालक, आरोग्यसेवा
एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट
Comments are closed.