NGN News
Latest Marathi News

150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण; धक्कादायक वास्तव समोर

  • खरात बडे अधिकारी, उद्योगपतींसोबत मुलींचे संबंध जुळवून द्यायचा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आतापर्यंत दाखल सर्व 10 गुन्ह्याचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जात असताना अनेक धक्कादायक बाबींची उकल झाली आहे. खरातने 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. जोडप्यांना समोर बसवून पत्नीमुळेच यशस्वी झाल्याचे पतीला सांगून तो महिलेच्या मनात सहानुभूती तयार करायचा. तसेच बडे अधिकारी, उद्योगपतींसोबत मुलींचे संबंध जुळवून द्यायचा. त्यासाठी तो अंकशास्त्राचा आधार घेत असल्याचे भासवायचा, असेही समोर आले आहे.  

एसआयटी टीमने बुधवारी रात्री उशिरा नाशिक क्राईम ब्राँचकडून डीव्हीआर, सीसीटीव्ही, लॅपटॉप, कागदपत्रे यासह सर्व मुद्देलमाल ताब्यात घेतला. या सर्व प्रकरणाचा एकत्रित तपास आता केला जाणार आहे. याचदरम्यान, खरातबाबत विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्या केबिनमध्ये तो महिलांचे लैंगिक शोषण करायचा, त्या केबिनच्या बाहेर असलेल्या झुंबरचा लाइट आतून बंद करीत असे. या झुंबरातील लाइट बंद तोपर्यंत चेंबरमध्ये कोणालाही प्रवेश द्यायचा नाही, हा त्याचा अर्थ असे. त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना ही सांकेतिक भाषा माहिती होती, असेही चौकशीत समोर आले आहे.

शिवानिका संस्थेचे बँक अकाऊंट सील

खरातच्या शिवानिका संस्थेचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) मालमत्तेची माहिती मागवली असून अशोक खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरु आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे.  मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास केला जाणार आहे. 

Comments are closed.