
- महापौर-उपमहापौरांसह मान्यवरांची उपस्थिती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सगुणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नाशिक शहरात सामाजिक समानता व शिक्षण क्रांतीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीचा सगळ्यातील साजरा करण्यात आला. हे दोन्ही महामानव सामाजिक न्याय, स्त्री-शिक्षण व दलित उभारणीसाठी आजीवन लढले, त्यांच्या विचारांनी लाखो लोकांना प्रेरित केले आहे.
मानागाल्वारी सकाळच्या सत्रात शालिमार येथील डॉ. बाबासाहेबांच्या पूर्णकृती पुतळ्यास महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. बुद्धवंदना व अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या पवित्र प्रसंगी महापौरानी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्याबद्दल मौलिक विचार मांडले. एका व्यक्तीने संविधान लिहून देशाला समता दिली, हीच खरी क्रांती आहे, असे उद्गार महापौरांनी काढले. त्यानंतर मातोश्री रमाबाई आंबेडकर मुलींचे वस्तीगृह, शालिमार येथील विद्यार्थिनींना सर्व मान्यवरांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले. महापौरानी विद्यार्थिनींना बाबासाहेबांचे विचार सांगत मार्गदर्शन केले. सगुणा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेश गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी समर्थ सहकारी बँक चेअरमन राधाकृष्ण नाईकवाडे, नगरसेवक प्रथमेश गीते, सचिन मराठे, सीमा पवार, विशाल पवार, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ संपादक मिलिंद सजगुरे, श्रीपाद कुलकर्णी, नाना शिलेदार, पी. के. गायकवाड, पी. के. काळे, कुणाल गायकवाड, अनिता भामरे, समीर देव, श्याम जाधव, रवींद्र कुलकर्णी, जयराम वाघ, संजय देवरे, सतीश मोरे, आशिष चौरासिया, भूषण महाजन, शंकर धनावडे, प्रशांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष राजेश गांगुर्डे, सेक्रेटरी दीपक कटारे, विजय अहिरे, राजेश शेळके, सुशील बर्वे, गणेश कमळाकर, सुधीर गायकवाड, भालचंद्र जाधव, लबीब मुल्ला यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले.
Comments are closed.