NGN News
Latest Marathi News

‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीची पहिली प्रत नाशकात मिळाली ?

  • इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून संशयित ताब्यात

नाशिक : गेल्या 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली ‘नीट’ (NEET 2026 ) परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला. देशभरात 42 तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून हा परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला  तथापि, यासंदर्भात एक खळबळजनक माहिती पुढे आली आहे.  फुटलेल्या प्रश्न पत्रिकेची पहिली प्रत नाशिकमध्ये तयार करण्यात आली होती. 

प्राप्त माहितीनुसार, नाशकात फुटलेल्या प्रश्न पत्रिकेची प्रत हरियाणाला पोहोचली, जिथे या फुटलेल्या प्रश्नपत्रेचे 10 संच तयार करण्यात आले. त्यानंतर, ही फुटलेली प्रश्नपत्रिका हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच राजस्थान या राज्यांमध्ये पोहोचली. याप्रकरणी एका व्यक्तीला व्यक्तीला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या संपूर्ण प्रकरणाची पोलिस आणि तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.

Comments are closed.