NGN News
Latest Marathi News

आ. राहुल ढिकले यांना पत्नीशोक; अदिती ढिकले कालवश

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. राहुल ढिकले यांच्या पत्नी अदिती ढिकले (वय ४०) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती आणि एक मुलगा असा परिवार आहे. आदिती ढिकले यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शुक्रवारी सायंकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने आदिती यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथील एका समारंभासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढिकले यांच्या नागचौकातील निवासस्थानी अदिती ढिकले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे आमदार, तसेच नेते मंडळी व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.