NGN News
Latest Marathi News

लासलगाव मर्चंट्स को-ऑप बँकेला २.९२ कोटींचा विक्रमी नफा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव : राकेश बोरा

येथील दि लासलगाव मर्चंट्स को-ऑप बँक लि.ने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत २ कोटी ९२ लाखांचा ढोबळ नफा मिळवला आहे. बँकेचे अध्यक्ष सी. ए. अजय ब्रम्हेचा आणि उपाध्यक्ष स्वप्नील डुंगरवाल यांनी ही माहिती दिली.

बँकेच्या स्थैर्यवृद्धीसाठी १ कोटी २० लाखांची तरतूद करण्यात आली असून, निव्वळ नफा १ कोटी ७२ लाख इतका झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात प्रतिकूल परिस्थिती असतानाही बँकेने यशस्वी कामगिरी केली आहे.

बँकेची एकूण ठेवी १८५ कोटी ४४ लाखांपर्यंत पोहोचल्या असून, स्वनिधी १५ कोटी ४३ लाख आहे. कर्जवाटप ९१ कोटी २१ लाखांपर्यंत झाले असून, गुंतवणूक ९२ कोटी २५ लाखांवर पोहोचली आहे. बँकेचा भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) १७.१९ टक्के असून, सलग तीन वर्षे एनपीए शून्य टक्के राखण्यात बँकेला यश आले आहे.

कर्मचारी व संचालक मंडळाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही कामगिरी साध्य झाल्याचे सांगण्यात आले. आगामी काळात बँकेचा एकूण व्यवसाय ३५० कोटींपर्यंत नेण्याचा मानस असून, नाशिक येथे नवीन शाखा सुरू करण्याचेही नियोजन आहे.

Comments are closed.