NGN News
Latest Marathi News

ओझरच्या जनशांती धाम येथे वस्तीगृह शुभारंभ

  • जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली उपक्रमाची सुरुवात

** एनजीएन न्यूज नेटवर्क

ओझर :अमर आढाव

ओझर येथील जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमातील देवभूमी जनशांती धाम येथे वस्तीगृहाचा शुभारंभ जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे शिक्षणासाठी बाहेरगावी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित, संस्कारयुक्त आणि आपुलकीचे वातावरण उपलब्ध होणार आहे.
कठोर तपस्वी,निष्काम कर्मयोगी, शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी तरुण पिढीला योग्य दिशा, धर्माची शिकवण आणि संस्कार मिळावेत या उदात्त हेतूने वस्तीगृह सेवा परंपरेचा पन्नास वर्षांपूर्वी शुभारंभ केला होता. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावे. त्यांना मायेचा आधार मिळावा आणि जीवनातील योग्य मार्गदर्शन व्हावे, हा या वस्तीगृह सेवा परंपरेमागील मुख्य उद्देश आहे.

भारतीय संस्कृतीचे जतन,चांगले संस्कार, धर्माचे महत्त्व, आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव आणि स्वावलंबी जीवनाची शिकवण या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जात आहे. विशेष म्हणजे अत्यंत नाममात्र सेवा देणगीत तसेच गरजू विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देत त्यांना हक्काचे स्थान दिले जात आहे.जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या पश्चात ही परंपरा उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे आणि यशस्वीरित्या सुरू आहे.राज्यात व देशभरातील काही राज्यात वस्तीगृह सुरू आहे.ओझर येथील जनशांती धाम येथेही गेल्या अनेक वर्षांपासून वस्तीगृह सुरू आहे.मात्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वस्तीगृहाचा लाभ व्हावा यासाठी नवीन इमारतीत भव्य हॉल मध्ये सुसज्ज निवासी व्यवस्था,स्वातंत्र्य भोजन व्यवस्था,विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष रहावे यासाठी वस्तीगृह निरीक्षक,व्यवस्थापक व स्वतंत्र सेवक नियुक्त करण्यात आले आहे.

या शुभारंभ प्रसंगी हृदयानंद माऊली, ज्ञानेश्वर भुसे,व्यवस्थापक संतोष अनवट,पत्रकार अमर आढाव, प्राचार्य ज्ञानेश्वर भालेराव,वस्तीगृह प्रमुख आनंद आचारी,सुभाष भडके,महेशगुरु शिवपुरी,संदीपगुरू मिश्रा,बाळासाहेब गोडसे,रामनाथ अनाठे, ओमकार पोमनार,आकाश दळवी,गौरव पवार,दीपक जाधव,ओम गाडे,अक्षय जाधव,अनिल ठाकरे,सिन्हा आचारी,आरोही आचारी, हिराबाई मत्सागर,लक्ष्मी तासकर,लंका पवार,शोभा गोराणे, सुगंधा घोलप, लीला गोडसे यांसह आश्रमिय सेवक उपस्थित होते.


@ कठोर तपस्वी, निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नव्हे, तर संस्कार, शिस्त आणि स्वावलंबन मिळावे याच हेतूने वस्तीगृह सुरू केले.त्यांच्याच कृपाशीर्वादाने आजही ही परंपरा सुरू आहे.

  • जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज

Comments are closed.