NGN News
Latest Marathi News

धक्कादायक ! मालेगावी अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती

  • दोन डॉक्टरसह ११ जणांच्या विरोधात गुन्हा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करून नवजात बालकाची विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचा संतापजनक प्रकार मालेगावमध्ये उघड झ्लाला आहे. याप्रकरणी दोन डॉक्टरसह ११ जणांच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलीची एका खासगी रुग्णालयात प्रसूती करण्यात आली. प्रसूती नंतर बाळाची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी डो. किशोर डांगे यांच्यासह ११ जांच्या विरोधात पोक्सो कायदा तसेच बेकायदेशीर प्रसूती आणि बालक व्यवहारासंबंधित विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. डांगे हे कोरोना महामारी काळात मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकपदी राहिलेले आहेत. तेव्हादेखील ते कोणत्या ना कोणत्या विवादास्पद कारणांनी चर्चेत राहिले होते. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सखोल चौकशी सुरु केली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

सिझेरिअन करत प्रसूती

अल्पवयीन मुलीला खासगी दवाखान्यात दाखल केल्यानंतर तिची सिझेरिअन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती संबंधितानी आरोग्य प्रशासन आणि पोलीस यांच्यापासून लपवली. कोणतीही कायदेशीर कागदपत्रे आणि तत्सम औपचारिकता पूर्ण न करता नियमांचे उल्लंघन करत प्रसूती करण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. प्रसुतीनंतर मुलीं अज्ञात ठिकाणी नेण्यात आले तसेच तिच्या बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न झाला.

Comments are closed.