
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर आज पासून सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर नाशिक येथे आज नूतन शैक्षणिक वर्षास जल्लोषात सुरुवात झाली. दीड महिन्याच्या दीर्घकालीन उन्हाळी सुट्टीनंतर नाशिक मधील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आगमन झाले. सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथेही आज नूतन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली. नूतन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. व इतर वेळी दैनिक परिपाठात विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. परंतु आज सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी दैनिक परिपाठ सादर केला.
आजच्या दैनिक परिपाठाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर पवित्र ग्रंथ बायबल मधील वचन पठण झाले. यानंतर विद्यालयातील शिक्षकांनी सुंदर प्रार्थना गीते सादर केली. नित्याप्रमाणे होत असलेल्या इतर गोष्टी शिक्षकांनी सादर केल्या त्यात सुविचार, प्रतिज्ञा व इतर बाबींचा समावेश होता. विद्यालयाच्या विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या भाषणातून स्वागत केले. त्यानंतर यावर्षी शाळेत नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शुभेच्छापत्र देऊन स्वागत करण्यात आले व त्यांचा परिचय करून देण्यात आला. पास्टर श्री संजय गावित यांनी विद्यार्थ्यांसाठी व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.शिक्षकांनी मुलांच्या स्वागतासाठी इतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम ही सादर केले. त्यात नाटिका याचा समावेश होता.
विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आगस्टीन पिंटो सर व संस्थापिका डॉक्टर ग्रेस पिंटो मॅडम यांनी नूतन शासन एक वर्षानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पाठविलेल्या संदेशाचे वाचन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील यांनी केले. या संदेशात संस्थापक सरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसह इतरही कला गुण आत्मसात करण्याचा सल्ला दिला व भविष्यात भारताचे सुजाण नागरिक माणूस स्वतःला सिद्ध करण्याचा संदेश दिला.
खेळीमेळीच्या वातावरणात व जल्लोषात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे, शितल चिंचोलीकर यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.