NGN News
Latest Marathi News

आयबी संचालकपदी नाशिकचे डॉ. महेश दिक्षित नियुक्त

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : देशाची सर्वोच्च अंतर्गत गुप्तचर संस्था म्हणून गणल्या जाणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो ( आयबी ) संस्थेच्या संचालकपदी येथील भूमिपुत्र डॉ. महेश दिक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नुकताच त्यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

मूळ नाशिकचे असलेल्या डॉ. दिक्षित यांचे प्राथमिक शिक्षण रंगुबाई जुन्नरे विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण आरवायके महाविद्यालयात झाले आहे. त्यानंतर त्यांनी पुण्यातील बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत ,मानसोपचारशास्त्रात एमडी पूर्ण केले. पाठोपाठ नागरी सेवेचा मार्ग निवडून ते भारतीय पोलीस सेवेत प्रवेशकर्ते झाले. आंध्र प्रदेश केडरचे अधिकारी असलेल्या डॉ. दिक्षित यांनी आजवरच्या सेवाकाळात नक्षलग्रस्त भागात प्रभावी कामगिरी केल्याची नोंद आहे. त्यानंतर त्याचीच दाखल घेत त्यांची इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नियुक्ती करण्यात आली. तबल ८ वर्षे ते काश्मीरच्या आयबी प्रमुखपदी कार्यरत राहिले. ईशान्य भारतात नागालँड सारख्या अतिसंवेदनशील भागातही त्यांची दखलपात्र कामगिरी राहिली. एक अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची देशभर ओळख आहे.

Comments are closed.