
- ग्राहकांच्या नोंदी गायब असल्याची बाब उघड; पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मोहीम
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : ग्राहकांच्या नोंदी गायब असल्याच्या कारणावरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी चार हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्राहक नोंदी ठेवणे हा सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण मुद्दा असताना संबंधित हॉटेल्सने तो दुर्लक्षित केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी करवी केली.
रॉयल ग्रीन लॉजिंग (महिरावणी शिवार), पिंक सिटी लॉजिंग (महिरावणी), स्काय लाईट रेस्टॉरंट आणि न्यू किनारा हॉटेल्स अशी कारवाई केलेल्या आस्थापनांची नवे आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरांत येणाऱ्या व्यक्तींच्या बाबत माहिती असणे अनिवार्य राहणार आहे. त्यादृष्टीने त्र्यंबकेश्वर पोलीस पथकाने सुमारे पंधरा हॉटेल्सची चौकशी केली. त्यावेळी या चार ठिकाणी ग्राहकांच्या नोंदी गायब असल्याची बाब लक्षात आली. यापुढे अशा नोंदी न ठेवणाऱ्या हॉटेल्स आणि लॉज मालक यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी दिला. दरम्यान, या कारवाईमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील हॉटेल्स चालकांचे धाबे दणाणले आहे.
Comments are closed.