
* * एनजीएन न्यूज नेटवर्क
मुंबई : बारावी परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के तर नाशिक विभागाचा निकाल 90.72 टक्के लागला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा राज्याचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन टक्क्यांनी घटला आहे. राज्यात एकूण 14 लाख 58 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
कुलकर्णी यांनी सांगितले की, फेब्रुवारी-मार्चमध्ये एकूण 153 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाईटवर आपला वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. यंदा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. राज्यातील सुमारे 14 लाख 58 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
यंदाही मुलींनी बाजी मारत 93.15 टक्के उत्तीर्णता मिळवली, तर मुलांचा निकाल 86.80 टक्के लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे 2 टक्क्यांची घट झाली आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखा 96.44 टक्क्यांसह अव्वल ठरली. वाणिज्य शाखेचा निकाल 87.03 टक्के, तर कला शाखेचा निकाल 78.02 टक्के लागला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभाग 94.14 टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे, तर लातूर विभागाचा निकाल 84.14 टक्के असून तो सर्वात कमी आहे.
विभागनिहाय निकाल असा :
1 . मुंबई : 90.08 टक्के
2. कोकण : 94.14 टक्के
3. पुणे : 91.25 टक्के
4. नागपूर : 88.67 टक्के
5. अमरावती : 90.92 टक्के
6. नाशिक : 90.72 टक्के
7. लातूर : 84.14 टक्के
8. छत्रपती संभाजीनगर : 88.68 टक्के
9. कोल्हापूर : 89.97 टक्के
Comments are closed.