
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणे नगरच्या विद्यार्थ्यांची अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत ‘सॅनसन’ फूडआस्थापनेस भेट दिली.
सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणे नगरचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अगस्टीम पिंटो सर, संस्थापिका डॉक्टर ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आज दिनांक 23 मार्च 2026 रोजी सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी नाशिक मधील चेतनानगर येथील ‘सॅनसन’आस्थापनेस भेट दिली. तिथे त्यांनी तृणधान्यांपासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांची माहिती घेतली जसे की असून तयार होणारे बिस्किटे व विविध चिवड्यांचे प्रकार याची माहिती घेतली. त्यांना ‘सॅनसन’चे सर्वेसर्वा श्री गौरव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रशिक्षण भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी मान्यवरांना आपल्या शंका विचारून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. श्री गौरव जाधव यांनी राणेनगर शाळेच्या या आगळ्या वेगळ्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगरच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीही या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत संगीत स्टुडिओ हॉटेल स्पोर्ट्स अकॅडमी भेट देऊन तेथील मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले आहे. या सर्व क्षेत्रभेटीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात त्यांना आपला व्यावसायिक प्रवास निवडण्यासाठी ( करियर) व्हावा. यासाठी हा स्तुत्य उपक्रम शाळेचे संस्थापक डॉक्टर अगस्टीन पिंटो सर यांनी सुरू केला आहे.
या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे, शितल चिंचोलीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed.