NGN News
Latest Marathi News

नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करा : समीर भुजबळ

  • अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी

** राकेश बोरा

लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे कांदा, द्राक्ष, मका, गहू यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावे. कुणीही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशा सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी केल्या.

समीर भुजबळ यांनी शनिवारी निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर, कोटमगाव, खडक माळेगाव, वनसगाव परिसरात अवकाळी पाऊस गारपीटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी दूरध्वनीद्वारे तहसीलदार यांच्याशी संपर्क करत सरसगट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, दत्तात्रय रायते, दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, पांडुरंग राऊत, विकास गोरे, राहुल डुंबरे, संतोष राजोळे, सोहेल मोमिन, इस्माईल मोमीन, मोहसिन शेख, सागर निकाळे, मोहन जावळे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

या पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी सरसगट पंचनामे करून मदत मिळवून देण्याची मागणी भुजबळ यांच्याकडे केली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वस्त केले. भुजबळ यांनी टाकळी विंचूर येथे काशिनाथ राजोळे व मनोज काळे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. तसेच कोटमगांव येथे सुधाकर विठ्ठल गांगुर्डे व नवनाथ बिलोरे, खडकमाळेगांव येथे दिलीप मुरलीधर रायते, वनसगांव येथे रावसाहेब भिमाजी शिंदे यांच्यासह परिसरातील अवकाळी गारपीट पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी केली.

Comments are closed.