
- शिक्षक दाम्पत्याकडून ‘टक्केवारी’ स्वीकारताना अटक
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : आपल्या हक्काच्या वेतनासाठी लढा देणाऱ्या शिक्षक दाम्पत्याकडून लाच मागणाऱ्या लेखा विभागाच्या त्रिकुटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील एका शिक्षक दाम्पत्याचे २००२ ते २०२६ या कालावधीतील ‘पेसा’ क्षेत्रातील वरिष्ठ वेतश्रेणीचे थकीत फरक देयक मंजूर झाले होते. सुमारे ६ लाख ५७ हजार रुपयांच्या या बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी आणि ते जिल्हा परिषद स्तरावर पाठवण्यासाठी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण ( गटशिक्षणाधिकारी), निलेश गिंबा भारती ( प्राथमिक शिक्षक) आणि देवीप्रसाद चैत्राम पाटील ( कनिष्ठ लेखा अधिकारी, जि.प. नाशिक) या संशयितांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदार शिक्षकाने कंटाळून नाशिक ‘एसीबी’कडे धाव घेतली. पडताळणीअंती, ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केल्यावर, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
Comments are closed.