NGN News
Latest Marathi News

गोदरेज ॲग्रोव्हेटमध्ये मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी म्हणून अनुश्री सिंग नियुक्त

** एनजीएन न्यूज नेटवर्क

मुंबई : गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडने (भारतातील सर्वात मोठ्या ‘फार्म-टू-प्रोटीन’ प्लॅटफॉर्मपैकी एक) अनुश्री सिंग यांची मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी (CHRO) म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा आज केली. या अंतर्गत अनुश्री कंपनीच्या कर्मचारी धोरणाचे नेतृत्व करतील आणि नेतृत्व
टीमसोबत संघटनात्मक क्षमता मजबूत करणे, प्रतिभा जोपासणे, तसेच गोदरेज ॲग्रोव्हेटच्या दीर्घकालीन व्यावसायिक उद्दिष्टांशी सुसंगत अशी भविष्यासाठी सज्ज, उच्च-कार्यक्षम संघटना तयार करण्याचे काम करतील.

त्यांचे स्वागत करताना, गोदरेज ॲग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सुनील कटारिया म्हणाले, “शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या आणि आपल्या राष्ट्राचे पोषण करणाऱ्या नवोपक्रमाद्वारे संपन्नता निर्माण करण्याचा आमचा उद्देश पुढे नेत असताना, आमचे कर्मचारी आणि नेतृत्व क्षमता मजबूत करणे हे देखील आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अनुश्री यांच्याकडे कर्मचारी परिवर्तन, संस्कृती निर्माण करणे आणि संघटनात्मक उत्कृष्टता यांमध्ये सखोल कौशल्य आहे आणि आम्हाला त्यांचे आमच्याकडे स्वागत करताना आनंद होत आहे. विकासाच्या प्रवासाचा पुढील टप्पा घडवण्यासाठी त्यांचे नेतृत्व कौशल्य आम्हाला महत्त्वाचे आहे. लवचिक संस्था उभारण्यासाठी आणि शाश्वत मूल्य निर्माण करण्यासाठी लोक हाच आधारस्तंभ आहेत, या गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या दृढ विश्वासाचेही त्यांची नियुक्ती हे प्रतीक आहे.”

अनुश्री या एक अनुभवी एचआर लीडर असून, त्यांना विविध उद्योग आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये कर्मचारी धोरण, संघटनात्मक परिवर्तन, संस्कृतिकता जपणे, विलीनीकरण आणि अधिग्रहण (M&A) एकत्रीकरण, संचालक मंडळ व्यवस्थापन आणि नेतृत्व विकास या क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. कर्मचारी धोरणांना व्यावसायिक उद्दिष्टांशी जुळवणे, मोठ्या प्रमाणावरील परिवर्तनाचे नेतृत्व करणे, विविधता आणि समावेशाला चालना देणे, आणि उच्च-कार्यक्षम संस्थांची उभारणी करणे यामध्ये अनुश्री यांचा हातखंडा आहे. गोदरेज ॲग्रोव्हेटमध्ये त्या कंपनीच्या विकासाच्या पुढील टप्प्याला पाठिंबा देण्यासाठी कंपनीचा कर्मचारीविषयक अजेंडा आणि संघटनात्मक क्षमता अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतील.

आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना गोदरेज ॲग्रोव्हेटच्या चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर अनुश्री सिंग म्हणाल्या, “गोदरेज ॲग्रोव्हेटच्या प्रवासातील अशा महत्त्वपूर्ण टप्प्यावर या कंपनीत सहभागी होताना मला खूप आनंद होतो आहे. या कंपनीचा वारसा अत्यंत समृद्ध आहे, तिचे उद्दिष्ट स्पष्ट आहे आणि यशाच्या केंद्रस्थानी माणसांना मानणारी कार्यसंस्कृती येथे जपली जाते. भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज अशी संस्था उभारण्यासाठी, तसेच कर्मचाऱ्यांशी संबंधित धोरणे अधिक बळकट करण्यासाठी आणि उच्च-कार्यक्षमता असलेली संस्कृती विकसित करण्यासाठी मी नेतृत्त्व टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे. मला असे वातावरण निर्माण करायचे आहे जिथे कंपनीच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांमध्ये अर्थपूर्ण योगदान देत असतानाच आमचे कर्मचारीही प्रगती करू शकतील.”

गोदरेज ॲग्रोव्हेटमध्ये सहभागी होण्यापूर्वी, त्यांनी जेएसडब्ल्यू एनर्जीमध्ये मुख्य मनुष्यबळ अधिकारी म्हणून काम केले, जिथे त्यांनी कंपनीच्या जलद वाढीमध्ये आणि परिवर्तनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी एव्हरी डेनिसन, अक्झोनोबेल आणि आदित्य बिर्ला ग्रुपमध्येही नेतृत्व पदे भूषवली आहेत, ज्यामुळे त्यांना भारत आणि जागतिक बाजारपेठांमधील व्यापक अनुभव प्राप्त झाला आहे. आपले नेतृत्व अधिक मजबूत करत असताना आणि भविष्यासाठी सज्ज क्षमतांमध्ये गुंतवणूक करत असताना अनुश्री यांची नियुक्ती ही कंपनीच्या सर्व भागधारकांसाठी शाश्वत वाढ आणि दीर्घकालीन मूल्य प्रदान करण्यास सक्षम, एक उच्च-कार्यक्षम संस्था उभारण्याच्या गोदरेज ॲग्रोव्हेटच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

Comments are closed.