** एनजीएन न्यूज नेटवर्क
कौटुंबिक समुपदेशन करतांना, पती पत्नी मधील वाद विवाद मिटवताना अथवा जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवताना लक्षात येते की प्रत्येक व्यक्ती ला स्त्री असो अथवा पुरुष त्याच्या बालपणी त्याच्या पालकांनी अथवा त्याला लहानच मोठं करणाऱ्यांनी जे संस्कार केले, ज्या चांगल्या वाईट सवयी लावल्या त्या त्यांना मोठे झाल्यावर, लग्न झाल्यावर, अगदी वय झाल्यावर पण खूप त्रासदायक ठरतात.
आजच्या लेखात आपण बघणार आहोत की लहानपणापासून मुलांना घरातून ज्या सवयी लावल्या जातात त्या जर चुकीच्या अथवा खूप हट्ट लाड पुरवणाऱ्या, मुलांच्या पुढे पुढे करणाऱ्या असतील तर पुढे मुलं मोठी झाल्यावर त्यांचं लग्न झाल्यावर आणि अगदी ती मुलं चाळीशी पन्नाशी ओलांडल्या वर पण घरातील इतरांना किती कशी त्रासदायक ठरतात.
लहानपणापासून केलेले अती लाड, आंधळं प्रेम मुलांना पार म्हातारे होईपर्यंत कसे नुकसान पोचवते? हे समजावून घेणे गरजेचे आहे. आजमितीला आपल्याला घरातील कोणत्याही व्यक्ती चा त्रास होत असेल, त्याच्या सवयी, स्वभाव यामुळे सगळे त्रस्त होत असतील तर ती त्या व्यक्ती ची चूक अथवा आताची वागणूक नसून त्याची पाळेमुळे त्याच्या बालपनात दडलेली असतात.
लहानपणी प्रेमाच्या नावाखाली लावलेल्या चुकीच्या सवयी आणि अतिलाड हे केवळ बालपणापुरते सीमित राहत नाहीत तर ते त्या मुलांचे पूर्ण भविष्य बाधित करतात. जास्त करून एकुलती एक मुलं, लग्नानंतर खूप वर्षांनी झालेली अपत्य, वैद्यकीय इलाज घेवून झालेली अपत्य, अनेक मुलींच्या जन्मा नंतर जलमलेला मुलगा, सख्या सावत्र कुटुंबातील मुलं किंवा मुली, अत्यंत गरिबीतून वर आलेल्या कुटुंबातील मुलगा किंवा अती श्रीमंत घरातील मुलं यांच्या बाबतीत बालपणी सर्वसामान्य वागणूक नं मिळता त्यांना कोणीतरी खास, खूप प्रयत्नाने, खूप खस्ता खावून झालेले अपत्य म्हणून जगा वेगळी वागणूक कुटुंबातील लोकांकडून दिली जाते.
अश्या स्पेशल, खास मुलांना लहानपणापासून सतत डोक्यावर घेतले जाते आणि त्याचे पडसाद तो मुलगा अथवा मुलगी अगदी वयस्कर होईपर्यंत राहतात. “मुलगा अजून लहान आहे”, “मोठा झाल्यावर समजेल” किंवा “त्याच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत” या विचारांतून झालेले अंधळे प्रेम मुलाच्या संपूर्ण आयुष्याला, अगदी वयाच्या पन्नाशीनंतरही, एका अदृश्य पण घातक साखळीत बांधून ठेवते.
लहानपणी पालकांकडून मुलांना लागणाऱ्या चुकीच्या सवयी नेमक्या कोणत्या असतात याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. मुलांचा हट्ट आणि अवाजवी मागण्या लगेच पूर्ण करणे ही मोठी चूक पालक करतात. मुलाला ‘नाही’ ऐकण्याची सवय लावली जातं नाही त्यामुळे ही मुलं मोठी झाल्यावर, वयस्कर झाल्यावर पण पण स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे गोंधळ कुटुंबात निर्माण करतात.
मुलांना लहान असतांना स्वतःची जबाबदारी स्वीकारू न देणे यामुळे मुलांच्या भविष्यात खूप मोठया समस्या निर्माण होतात. स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय मुलांना लावणे अत्यंत गरजेचे असते. स्वतःचे कपडे, कपाट व्यवस्थित ठेवणे, घर आवरणे, स्वतःच्या अंघोळीचे पाणी स्वतः घेणे, जेवायला वाढून घेणे, स्वतःचे ताट उचलणे, घरातील साफ सफाई करणे, चहा, कॉफी थोडेफार पदार्थ स्वतः बनवून घेणे या सवयी लहानपणापासून नसतील तर पुढे लग्न झाल्यावर बायकोने नवऱ्याला सगळं हातात देणे आणि त्याच्या आजूबाजूला मिरवणे यास नकार दिला तर त्यातून भांडण उभी राहतात. अश्याच सवयी मुलींना लहानपणी लावल्या नाहीत तर सासरी गेल्यावर तेथील काम करतांना, जबाबदारी घेतांना मुलींना खूप जड जाते आणि पर्यायाने वाद निर्माण होतात. स्वतः आव्हानांना तोंड देणे देखील मुलांना लहानपणापासून शिकवलं पाहिजे. मुलं लहान असतांना त्याच काही चुकलं किंवा त्याच्या कडून कोणत्याही स्वरूपात नुकसान झालं तर त्याने स्वतः त्यातून मार्ग कसा काढावा यासाठी पालकांनी त्याला सक्षम लहानपणा पासून मुलांना पालकांनी लावलेल्या चुकीच्या सवयी आणि त्याचे भविष्यातील परिणाम
कौटुंबिक समुपदेशन करतांना, पती पत्नी मधील वाद विवाद मिटवताना अथवा जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवताना लक्षात येते की प्रत्येक व्यक्ती ला स्त्री असो अथवा पुरुष त्याच्या बालपणी त्याच्या पालकांनी अथवा त्याला लहानच मोठं करणाऱ्यांनी जे संस्कार केले, ज्या चांगल्या वाईट सवयी लावल्या त्या त्यांना मोठे झाल्यावर, लग्न झाल्यावर, अगदी वय झाल्यावर पण खूप त्रासदायक ठरतात.
आजच्या लेखात आपण बघणार आहोत की लहानपणापासून मुलांना घरातून ज्या सवयी लावल्या जातात त्या जर चुकीच्या अथवा खूप हट्ट लाड पुरवणाऱ्या, मुलांच्या पुढे पुढे करणाऱ्या असतील तर पुढे मुलं मोठी झाल्यावर त्यांचं लग्न झाल्यावर आणि अगदी ती मुलं चाळीशी पन्नाशी ओलांडल्या वर पण घरातील इतरांना किती कशी त्रासदायक ठरतात.
लहानपणापासून केलेले अती लाड, आंधळं प्रेम मुलांना पार म्हातारे होईपर्यंत कसे नुकसान पोचवते? हे समजावून घेणे गरजेचे आहे. आजमितीला आपल्याला घरातील कोणत्याही व्यक्ती चा त्रास होत असेल, त्याच्या सवयी, स्वभाव यामुळे सगळे त्रस्त होत असतील तर ती त्या व्यक्ती ची चूक अथवा आताची वागणूक नसून त्याची पाळेमुळे त्याच्या बालपनात दडलेली असतात.
लहानपणी प्रेमाच्या नावाखाली लावलेल्या चुकीच्या सवयी आणि अतिलाड हे केवळ बालपणापुरते सीमित राहत नाहीत तर ते त्या मुलांचे पूर्ण भविष्य बाधित करतात. जास्त करून एकुलती एक मुलं, लग्नानंतर खूप वर्षांनी झालेली अपत्य, वैद्यकीय इलाज घेवून झालेली अपत्य, अनेक मुलींच्या जन्मा नंतर जलमलेला मुलगा, सख्या सावत्र कुटुंबातील मुलं किंवा मुली, अत्यंत गरिबीतून वर आलेल्या कुटुंबातील मुलगा किंवा अती श्रीमंत घरातील मुलं यांच्या बाबतीत बालपणी सर्वसामान्य वागणूक नं मिळता त्यांना कोणीतरी खास, खूप प्रयत्नाने, खूप खस्ता खावून झालेले अपत्य म्हणून जगा वेगळी वागणूक कुटुंबातील लोकांकडून दिली जाते.
अश्या स्पेशल, खास मुलांना लहानपणापासून सतत डोक्यावर घेतले जाते आणि त्याचे पडसाद तो मुलगा अथवा मुलगी अगदी वयस्कर होईपर्यंत राहतात. “मुलगा अजून लहान आहे”, “मोठा झाल्यावर समजेल” किंवा “त्याच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत” या विचारांतून झालेले अंधळे प्रेम मुलाच्या संपूर्ण आयुष्याला, अगदी वयाच्या पन्नाशीनंतरही, एका अदृश्य पण घातक साखळीत बांधून ठेवते.
लहानपणी पालकांकडून मुलांना लागणाऱ्या चुकीच्या सवयी नेमक्या कोणत्या असतात याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. मुलांच्या हट्ट आणि अवाजवी मागण्या लगेच पूर्ण करणे मुलाला ‘नाही’ ऐकण्याची सवय नसणे या गोष्टी भविष्यात त्रासदायक ठरतात. अशी मुलं मोठी झाल्यावर स्वतःला हवे ते मिळण्यासाठी कुटुंबात अनेक गोंधळ निर्माण करतात. मुलांना स्वतःची जबाबदारी स्वीकारू न देणे ही चूक सुद्धा पुढे खूप महागात पडते. स्वतःची कामे जसे की स्वतःचे कपडे, कपाट, जागा आवरणे, वस्तू जागेवर ठेवणे, घरात स्वच्छता करणे, स्वतःच्या अंघोळीचे पाणी स्वतः घेणे, जेवण वाढून घेणे, चहा कॉफी अगदी साधे पदार्थ तरी स्वतः बनवून घेणे या सवयी लहानपणी लागल्या नाहीत तर मुलगा असो वा मुलगी भविष्यात घरातील लोकांसाठी ते तापदायक ठरते.
लहानपणापासून मुलांना आव्हानांना तोंड देणे शिकवले पाहिजे. लहान असतांना मुलांकडून काही निर्णय चुकले अथवा काही नुकसान झाले तर मुलांनी स्वतः त्यातून मार्ग काढणे, चुकीमधून धडा घेणे, आव्हाने पेलने जर अंगावळणी पडले तर मोठेपणी मुलं स्वावलंबी होतात. मुलांच्या प्रत्येक संकट काळात पालक धावून आले तर भविष्यात पण असे लोकं स्वतः चुका करतात आणि सर्व घराला ते निस्तरावे लागते कारण त्यांना स्वतःची जबाबदारी घेणे आणि स्वतःच्या जीवावर संकटातून मार्ग काढणे समजलेले नसते.
मुलांच्या चुकांवर पांघरूण घालणे ही खूप मोठी चूक मुलांना वाढवताना मोठी माणसे करतात. मुलांमध्ये शिस्तीचा अभाव निर्माण होणे प्रत्येक चुकीचे समर्थन पालकांनीच करणे यामुळे मुले मोठी झाल्यावर मोठया स्वरूपात चुका करणे, मोठे नुकसान करणे, चुकीच्या मार्गाला लागणे असे प्रकार घडतात. लहानपणापासून मुलांना सवय असते की आपली चूक घरातले झाकून ठेवतील, आपल्याला खंबीर पाठिंबा देतील त्यामुळे अश्या व्यक्तींनी कितीही चुका केल्या तरी शेवटपर्यंत पालकांना साथ द्यावीच लागते आणि अश्या वृत्ती मुळे संपूर्ण घराचे नुकसान होते.
अनेक मुलं लहानपणी केलेल्या चुकीच्या संस्कारांचे परिणाम आयुष्यभर भोगतात. भावनात्मक अपरिपक्वता (Emotional Immature) जसे की रागावर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे शिक्षण बालपणी मिळाले नाही तर पुढील आयुष्यात कोणत्याही कारणास्तव त्यांना येणारा राग मोठी कौटुंबिक हानी घडवून आणतो. अश्या मुलांना पुढे स्वतःच्या कोणत्याही भावनांना वेळीच मर्यादा घालता नं आल्यामुळे ते कश्याही साठी कोणत्याही स्तराला जावू शकतात.
बालपणी, मोठे होतांना मुलांवर योग्य संस्कार, सवयी लावले नसल्यास वय वाढल्यावर, लग्न झाल्यावर आणि उतार वयात अगदी पन्नाशीनंतर सुद्धा खूप त्रास होतो. सर्वात मोठी समस्या म्हणजे ज्या मुलांना पालकांनी शिस्त लावलेली नसते त्यांच्या वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्यात तणाव निर्माण होतात. लहानपणापासून फक्त स्वतःचाच विचार करण्याची सवय जडल्यामुळे ही मुले मोठी झाल्यावर सहचारिणीशी किंवा जोडीदाराशी जुळवून घेऊ शकत नाहीत, यांच्यात लवचिकता नसते त्यामुळे “माझंच खरं” करण्याची वृत्ती लग्नानंतरच्या नात्यात प्रचंड कटुता आणते. दुसऱ्याला प्राधान्य देणे, इतरांच्या मनाचा मतांचा विचार करणे, इतरांना आदर देणे, थोडेफार झुकणे, माघार घेणे यांना माहिती नसते त्यामुळे अश्या मुलांची लग्न टिकणे अवघड असते. पन्नाशीत आल्यावरही घरातील प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयामध्ये जोडीदाराची किंवा मुलांची मतं लक्षात न घेणे, यामुळे कुटुंबात दुरावा निर्माण होतो. लहानपणी लागलेली प्रत्येकाने आपल्या पुढे पुढे करावे, आपलेच म्हणणे घरात चालावे यामुळे उतार वयात सुद्धा हे लोकं घरातील इतरांना वेठीस धरतात.
लहानपणी सतत लाडाने वेड करून, कुरवाळून घेतलेल्या मुलांना मोठेपणी जबाबदारी पेलण्यात अपयश येते.
लहानपणी त्रास सहन न केल्यामुळे मोठेपणी आयुष्यात येणाऱ्या अडचणी, आर्थिक संकटे किंवा कौटुंबिक प्रश्न हाताळताना यांची दमछाक होते. पन्नाशीत आल्यावरही स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेण्याऐवजी दोष दुसऱ्यांवर ढकलण्याची सवय कायम राहते. स्वतः चुका करून पण इतरांना जबाबदार धरणे, चुकीचे आर्थिक व्यवहार किंवा घरासाठी, घरातील लोकांसाठी नुकसानकारक निर्णय स्वतः घेतलेले असून, पण त्यासाठी कुटुंबातील लोकांना दोष देणे असे प्रकार या लोकांच्या बाबतीत नेहमीच घडतात.
बालपणी चुकीच्या पद्धतीने वाढवलेल्या मुलांमध्ये भविष्यात अति-स्वामित्व आणि हट्टी स्वभाव वाढीस लागतो. अति लाडात वाढलेली व्यक्ती वय वाढले तरी स्वभावाने ‘लहान मूल’च राहते. घरातील सर्वांनी आपल्याच शब्दाप्रमाणे चालले पाहिजे, हा अट्टहास घरातील इतरांसाठी प्रचंड मानसिक त्रासाचा ठरतो. अशा व्यक्तींशी संवाद साधणे घरातील तरुण पिढीला आणि जोडीदाराला कठीण जाते. या व्यक्ती उतारवयात सर्व घराला, घरातील लोकांना दबावात आणि धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपण लोकांना मोकळीक दिली, स्वातंत्र्य दिले तर या घरात माझी किंमत कमी होईल, मला कोणी घाबरणार नाही, मी अजून थकल्यावर मला कोणी विचारणार नाही आणि माझा पहिल्यासारखा रुबाब राहणार नाही अशी या लोकांची मानसिकता झालेली असते.
बालपणी कोणाचेही ऐकून घेण्याचे वळण पालकांनी लावले नसल्यास सामाजिक आणि व्यावसायिक नातेसंबंधात एकटेपणा निर्माण होतो. कामाच्या ठिकाणी किंवा समाजात जेव्हा या व्यक्तींना इतरांचे ऐकून घ्यावे लागते किंवा त्यांच्या मनासारखे होत नाही, तेव्हा ते कमालीचे अस्वस्थ होतात. त्यांच्या वर कोणी गेलेले किंवा असलेले त्यांना आवडत नाही त्यामुळे ते प्रगती करणाऱ्या पुढे जाणाऱ्या लोकांमध्ये खोड्या काढून त्यांच्याशी संबंध तोडून टाकतात. नौकरी व्यवसाय करतांना जो नम्र पणा, प्रामाणिक पणा, समजूतदार वृत्ती लागते ती यांना लहानपणापासून अंगवळणी पडलेली नसते म्हणून अनेकदा हे लोकं नौकरी व्यवसाय या ठिकाणी अपयशी होतात.
बालपणी झालेले चुकीचे संस्कार पन्नाशीनंतर, जेव्हा माणूस निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतो, तेव्हा त्यांना जवळचे मित्र किंवा समाज दुरावल्याचा भास होतो आणि ते एकाकी पडतात. उतार वयात या लोकांच्या जवळ फारस कोणी हक्काचं प्रेमाचं राहत नाही कारण आयुष्य भर यांनी समाजातील, घरातील, मित्र परिवारातील सदस्यांना खूपदा दुखावलेले असते, अपमानित केलेले असते. यांच्या जवळपास असणाऱ्या लोकांची सहनशक्ती संपल्यावर किंवा यांच्या स्वभावातील दोषाचा खूप त्रास झाल्यामुळे हक्काच्या जवळच्या लोकांनी स्वतःचा मार्ग बदलून घेतलेला असतो आणि घरातील लोकंच यांच्या पासून चार हात लांब राहणे पसंत करतात. यांची समाजात पण फारशी जवळीक, आपुलकी किंवा बंध तयार झालेले नसतात कारण स्वतःच च खरं करण्याच्या नादात अनेक नाती यांनी तोडलेली असतात.
लहानपणी योग्य संस्कार नं झाल्यामुळे अश्या व्यक्ती कायमची मानसिक अस्वस्थता अनुभवत असतात. जग आपल्या मर्जीनुसार चालत नाही हे पाहिल्यावर त्यांना येणारे नैराश्य आणि चिडचिड परिस्थिती अधिक बिघडण्यासाठी कारणीभूत ठरते. अश्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची पोकळी निर्माण झालेली असते. संकटांशी स्वतः दोन हात करण्याची क्षमता लहानपणीच मारली गेल्यामुळे, वयाच्या उत्तरार्धातही अंतर्गत भीती कायम राहते. उतार वयात पण या लोकांना कोणाच्या तरी मदतीची, यांना सावरून सांभाळून घेणाऱ्या लोकांची गरज भासते. नात्यांमधील पोकळी या लोकांना उतार वयात खूप त्रासदायक ठरते. अतिलाडातून निर्माण झालेला अहंकार त्यांना कोणाशीही मनापासून जोडू देत नाही. त्यामुळे उतारवयात जेव्हा सर्वात जास्त प्रेमाची गरज असते, तेव्हा नात्यांमध्ये कोरडेपणा अनुभवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही.
लहानपणीचे अतिलाड हे औषधाऐवजी दिलेल्या साखरेच्या गोळीसारखे असतात—ते क्षणिक गोड वाटतात, पण भविष्यात संपूर्ण आयुष्याला ‘डायबिटीज’सारखी दीर्घावधीची व्याधी लावून जातात. योग्य वयात दिलेली योग्य शिस्त आणि ‘नाही’ ऐकण्याची सवय हेच मुलाच्या उर्वरित आयुष्याचे खरे संरक्षण कवच असते.
काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे
Comments are closed.