
** एनजीएन न्यूज नेटवर्क
सटाणा : श्रीकांत रौंदळ
नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाज संस्था अंतर्गत कळवण, सटाणा, मालेगाव देवळा येथील समाज संस्था संयुक्त विद्यार्थी व समाज बांधव गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णागिरी गोसावी तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, नगराध्यक्षा हर्षदा सोनवणे, शिवव्याख्याते प्रा.यशवंत गोसावी, प्राचार्य अनिल पाटील, अनुप गोसावी, केशव गोसावी, गोविंदराव गोसावी, साहेबराव गोसावी, पत्रकार विशाल गोसावी, किशोरभाऊ कदम आदींसह जिल्हा संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते.
याप्रसंगी सुमारे ऐशी समाजबांधवांना विविध पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.तसेच 150 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाला सढळ हाताने देणगी देऊन हातभार लावणाऱ्या सर्व समाज बांधवांचे आभार मानण्यात आले . नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाज संस्थेचे विश्वस्त मा.धर्मराज गोसावी यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन सटाणा शहर व बागलाण तालुका समाज बांधव यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले. कळवण, सटाणा,देवळा, मालेगाव, येथील सर्व समाज बांधवांनी नियोजनात आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमास कसमादे परिसरातून समाज बांधव व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मराज गोसावी, सतीश भारती ,डॉ. एन. टी. गोसावी, कारभारी भारती, ॲड. प्रकाश गोसावी, शरद गोसावी ,कन्हैयालाल गोसावी, रवींद्र गोसावी टेलर, प्यारेलाल गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. बागलाण तालुका अध्यक्ष सतिष भारती यांनी प्रास्तावीक केले. श्री. अभिजीत गोसावी व श्रीकृष्ण गिरी यांनी सूत्रसंचालन केले.भास्कर भारती यांनी आभार मानले.
Comments are closed.