NGN News
Latest Marathi News

तरुप्रीत प्रकल्पांतर्गत जि. प. शाळा मऱ्हळ बु. येथे वृक्षारोपण

सिन्नर : एनजीएन न्यूज नेटवर्क

तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने बीजारोपण व वृक्षारोपण करणाऱ्या डॉ. मंगल सांगळे व प्रा.प्रियांका केदार ह्यांनी सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मऱ्हळ बु. येथे वृक्षारोपण केले. यावेळी आंबट चिंच, खिरणी, जांभूळ, सिसव, मोह, बेल, कडुलिंब, कांचन, सप्तपर्णी, हादगा यांसारख्या विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रामहरी धेंडुळे तसेच शिक्षक अनिल उकले व नानासाहेब भांड व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेजवळील परसबागेत यावेळी हादगा या रोपांची लागवड करण्यात आली. हिरवळ पसरावी म्हणून तरुप्रीत प्रकल्पाच्या वतीने भविष्यात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. मंगल सांगळे यांनी सांगितले.

वर्षभर तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून पर्यावरणपूरक काम केले जाते. ‘रोपटे आमचे अंगण तुमचे’ ह्या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. बीजारोपण व वृक्षारोपण करूया, वसुंधरेचा हिरवेपणा जपुया हे ब्रीद असणाऱ्या तरुप्रीत प्रकल्पाची हिरवळ मोहीम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.

Comments are closed.