
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : 14 सप्टेंबर राष्ट्रभाषा हिंदी दिवस वाढदिवसाचे औचित्य साधून सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथे संस्थेचे संस्थापक डॉक्टर ऑगस्टिन पिंटो, संस्थापिका डॉक्टर ग्रेस पिंटो, यांच्या मार्गदर्शनाद्वारे राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षिका मनिषा अनिल सांगळे लाभल्या होत्या . या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर पवित्र ग्रंथ बायबल मधील वचन पठण झाले. त्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी प्रार्थना गीते सादर केली. त्यानंतर या विद्यार्थिनीने मान्यवर अतिथींचे स्वागत केले. त्यानंतर अतिथींचा परिचय करून देण्यात आला व त्यांचा एक रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यात इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी मनमोहक गुजराती नृत्य ( गरबा ) सादर केला. मान्यवर अतिथींच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यानंतर मान्यवर अतिथींनी हिंदी भाषेचे महत्त्व विशद करून हिंदी भाषेचा गौरव वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असावे असे आपल्या भाषणात नमूद केले. हिंदी दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी अनेक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. जसे की कविता वाचन स्पर्धा निबंध लेखन स्पर्धा वादविवाद स्पर्धा यांचा समावेश होता. हिंदी कथा लेखन स्पर्धा इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हास्य कवि संमेलन आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवर अतिथींच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मान्यवर अतिथिनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अशा या रंगारंग कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभाग प्रमुख प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख उषा शेट्टी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.