
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये राज्याचे माजी मंत्री तथा वरळीचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये जबाब नोंदवून घेण्यासाठी परवानगी दिल्यानंतर तिच्या सीबीआयने तिच्या वडिलांचा जबाब नोंदवल्यावर हा एफआयआर दाखल केला आहे.
मुख्य गुन्हे घडवणे, गुन्हेगारी कट, त्यानंतर आत्महत्येची खोटी कहाणी तयार करणे आणि तिचा प्रसार करणे, आणि पुरावे दडपणे, नष्ट करणे आणि/किंवा त्यात फेरफार करणे या संदर्भात ज्या व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे, रोहन रॉय, डिनो मोरिया, सूरज पांचोली, आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सचिन वाझे, परमबीर सिंग, डीसीपी विशाल ठाकूर, अनिल देशमुख, एपीआय अशोक देवधे, पीआय जगदेव कलापड, पीआय शैलेंद्र नागरकर, पीआय चिमाजी आधव, पीआय अर्जुन राजाने, मालवणी पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी, विलंबित शवविच्छेदनाशी संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी, डॉ. संजय जाधव, कलिना येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे संबंधित अधिकारी, ज्यात सहाय्यक रासायनिक विश्लेषक एन. पी. भाले, तत्कालीन संबंधित व्यक्ती आणि इतर पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे.
@ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे आणि इतरांनीही या कटात आणि त्यानंतरच्या प्रकरण दडपण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संबंधित लोकसेवक आणि पोलीस अधिकारी हे देखील खटल्याची कागदपत्रे, फायली आणि इतर सार्वजनिक नोंदी नष्ट करणे किंवा दडपणे, अधिकृत नोंदींमध्ये फेरफार करणे, आणि बेकायदेशीर हेतूंसाठी व गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी सार्वजनिक निधी, मनुष्यबळ आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याबद्दल चौकशीस पात्र आहेत.
- सतिश सालियान, दिशाचे वडील
Comments are closed.