NGN News
Latest Marathi News

भाजपा पाथर्डी मंडलाध्यक्षपदी नितीन कुलकर्णी नियुक्त

  • सरचिटणीसपदी सुभाष महाले भरत शिरसाठ; युवा मोर्चा अध्यक्ष संदीप दोंदे, महिला मोर्चा अध्यक्ष नलिनी दराडे

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगरच्या पाथर्डी मंडलाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, मंडलाध्यक्षपदी श्री. नितीन विजयराव कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी मंडलातील विविध पदांवर कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

उपाध्यक्ष
सौ. पुष्पा साहेबराव आव्हाड, श्री. त्र्यंबक कोंबडे, श्री. पंडीत कडाळे, श्री. उत्तम उघाडे, श्री. उत्तम सानप, श्री. जगन्नाथ काळे व सौ. शितल सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरचिटणीस
श्री. सुभाष श्रवण महाले व श्री. भरत शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली

चिटणीसपदी श्री. महेंद्र अमृतकर, सौ. अर्चना नावरकर, ॲड. वामन सदाशिव जाचक, श्री. भूपेंद्रकुमार पांडुरंग नेर, श्री. माधव शेळके, श्री. दगडु पाटील व श्री. भरत कुमार वाघ यांची नियुक्ती झाली आहे. कोषाध्यक्षपदी श्री. योगेश रेवगडे (पाटील) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोर्चांच्या अध्यक्षांची नियुक्ती

युवा मोर्चा अध्यक्ष – श्री. संदिप भगवान दोंदे
महिला मोर्चा अध्यक्षा – सौ. नलिनी परमेश्वर दराडे
अनु. जाती मोर्चा अध्यक्ष – श्री. सुजित सुनिल मोरे
अनु. जनजाती मोर्चा अध्यक्ष – श्री. रविंद्र नथु ठाकूर
ओबीसी मोर्चा अध्यक्ष – श्री. योगेश पाटील
किसान मोर्चा अध्यक्ष – श्री. गणेश वाजे
अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष – आदिल शेख

आघाडी, प्रकोष्ठ व सेल

पाथर्डी मंडलातील विविध आघाडी, प्रकोष्ठ व सेलच्या प्रमुखांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये

कामगार प्रकोष्ठ – श्री. हेमंत निवृत्ती पवार, उत्तर भारतीय प्रकोष्ठ – सौ. सीमा संतोषकुमार गुप्ता, उद्योग आघाडी – श्री. सागर बिडस्कर, व्यापारी आघाडी – श्री. संतोष सांगळे, भटके-विमुक्त आघाडी – श्री. राजेंद्र शिंदे, अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ – श्री. अभिजित उपाध्ये, जैन प्रकोष्ठ – श्री. संदिप जैन, पदवीधर प्रकोष्ठ – श्री. दिनेश पाटील, राजस्थान प्रकोष्ठ – श्री. हनुमान मोहन, चित्रपट प्रकोष्ठ – श्री. लक्ष्मण रघुनाथ नवले, वैद्यकिय प्रकोष्ठ – डॉ. प्रवीण गोविंदराव केंगे, कायदा सेल – ॲड. मनिष पाटील, सहकार सेल – श्री. मयुर संजय महाजन, माजी सैनिक सेल – श्री. गोपीनाथ खैरनार, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल – श्री. अमृत तांबट, दिव्यांग सेल – श्री. उमाकांत दत्तात्रय आहिरे, ट्रान्सपोर्ट सेल – श्री. मंगेश पांडे यांचा समावेश आहे.

तसेच दक्षिण भारतीय प्रकोष्ठ – श्री. उमेश शेट्टी, शिक्षक प्रकोष्ठ – श्री. अमित करवंदे, क्रीडा प्रकोष्ठ – सौ. श्रद्धा नालमवार, बुद्धिजीवी प्रकोष्ठ – श्री. आशिष विनायक दाभोळकर, सांस्कृतिक प्रकोष्ठ – सौ. रोहिणी हितेश बागुल, आयुष्यमान भारत – श्री. भास्कर गोवर्धन देसले, बेटी बचाओ-बेटी पढाओ सेल – सौ. अश्विनी शिंपी, आय.टी. सेल – श्री. ज्ञानेश्वर श्रीहरी कामाने, सोशल मीडिया – श्री. आदित्य किरण वाजे, पंचायत राज व ग्रामविकास – श्री. दिनेश बच्छाव, प्रसिद्धी प्रमुख – श्री. बाळासाहेब बोडके, पर्यटन विकास मंच – श्री. विजय शिंपी, तिर्थक्षेत्र आघाडी – श्री. प्रेमकुमार फेगडे, अंत्योदय सेल – श्री. सुनिल खैरनार, योग प्रकोष्ठ – श्री. रत्नाकर पोतदार, अभियंता सेल – श्री. तेजस प्रकाश वाघ व केमिस्ट सेल – श्री. सागर राजेंद्र देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाथर्डी मंडल कार्यकारिणीमध्ये सदस्य तसेच कायम निमंत्रित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून मंडलातील संघटन अधिक मजबूत करून बूथ पातळीपर्यंत पक्षाचे काम गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या प्रसंगी नाशिक पश्चिमच्या आमदार सौ. सीमाताई हिरे, भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष श्री. सुनिल केदार, महानगर महामंत्री श्री. सुनील देसाई , सौ. रश्मीताई हिरे- बेंडाळे तसेच नगरसेवक श्री. भगवान सुकदेव दोंदे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नूतन सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून पाथर्डी मंडलातील संघटन अधिक सक्षम व गतिमान करून पक्षाची विचारधारा आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे काम करण्यात येणार आहे.

Comments are closed.