- पाचशे रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी देवेंद्र भावसार ‘एसीबी’च्या जाळ्यात
** एनजीएन न्यूज नेटवर्क
सटाणा : श्रीकांत रौंदळ
वारसा हक्काने मिळालेल्या जागेची नोंद तक्रारदाराच्या नावावर करून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सटाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक देवेंद्र मधुकर भावसार(वय ५१) यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक नियमाच्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील ४८ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांचे सटाणा शहरातील नेहरू रोड, कोर्ट गल्ली परिसरात भूमापन क्रमांक 199 मध्ये घर आहे. हे घर वारसा हक्काने स्वतःच्या नावावर नोंदवून घेण्यासाठी तक्रारदाराने भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधला होता. संबंधित काम करून देण्यासाठी उप अधीक्षक देवेंद्र भावसार यांनी 500 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
तक्रारीनुसार पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्या नंतर भूमि अभिलेख कार्यालयात सापळा रचण्यात आला. या कारवाईत भावसार यांना ताब्यात घेण्यात आले.
Comments are closed.