NGN News
Latest Marathi News

देवळाली छावणी हद्दीत दिवसाआड पाणीपुरवठा; पाणी काटकसरीने वापराचे आवाहन

** एनजीएन न्यूज नेटवर्क

देवळाली कॅम्प : पुरुषोत्तम कांडेकर

हिवाळा सुरू होण्याच्या आधीच उन्हाची तीव्रता वाढल्याने व यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भगूर, देवळाली कॅम्प परिसरातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर देवळाली छावणी परिषदेने हद्दीतील सर्व नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे.

येत्या गुरूवार (दि.५) पासून देवळाली कॅम्प छावणी परिषद हद्दीत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. शासनाच्या आदेशानुसार एक दिवशी पाणीपुरवठा होईल व पुढील दिवशी पाणीपुरवठा बंद राहील. हा क्रम पुढील सूचना मिळेपर्यंत कायम राहणार आहे.

सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, आवश्यक तेवढेच पाणी साठवून ठेवावे व पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणि त्रिपाठी यांनी केले आहे.

@ देवळाली कॅन्टोमेंट हद्दीतील लोकसंख्या आता ५० हजारावर गेली आहे. धारणा धरणात पुरेसे पाणी आहे. त्यातून आवर्तन सोडण्यास अवकाश असल्याने आहे. परंतु, पाणी टंचाई लक्षात घेऊन धरणातून त्वरित आवर्तन सोडावे अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

–सचिन ठाकरे (नामनिर्देशित सदस्य, कॅन्टोमेंट बोर्ड)

Comments are closed.