NGN News
Latest Marathi News

डॉ. सुभाष चंद्रा आणि बंधू हिसारमध्ये नंदकिशोर गोयनकाजी स्मृत्यर्थ शिक्षण संस्था स्थापणार

  • गोयनका कुटुंब अग्रोहाहिसार येथे ३२ एकर जागेवर श्री नंद किशोर गोयनका युनिव्हर्सिटी‘ सुरू करणार आहे. यासाठी कुटुंबाच्या वतीने सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
  • स्वर्गवासी श्री नंद किशोर गोयनका जी यांच्या स्मरणार्थ गोयनका कुटुंबाने हिसारमध्ये दररोज शांती बैठक‘ आयोजित केली आहे. २६ जुलै २०२६ रोजी रस्म पगडी‘ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा आणि त्यांचे बंधू—श्री लक्ष्मी नारायण गोयल, श्री जवाहर गोयल आणि श्री अशोक गोयल यांनी आपले स्वर्गवासी वडील श्री नंद किशोर गोयनका जी यांच्या स्मृतींना चिरंतन आदरांजली म्हणून अग्रोहा, हिसार येथे ‘श्री नंद किशोर गोयनका युनिव्हर्सिटी’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

ही शिक्षण संस्था गोयनका कुटुंबाच्या स्वमालकीच्या ३२ एकर जमिनीवर उभारली जाणार असून, यामध्ये जवळपास १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. समाजसेवा आणि जनकल्याण या मूल्यांवर केंद्रित असलेल्या या विद्यापीठाची रचना एक ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’ (उत्कृष्टता केंद्र) म्हणून करण्यात आली आहे. हे विद्यापीठ स्वर्गवासी श्री नंद किशोर गोयनका जी यांनी सामाजिक कार्याप्रती आजीवन दिलेले योगदान आणि त्यांची कटिबद्धता पुढे नेण्याचे काम करेल. हे विद्यापीठ ‘समाजसेवा’ आणि ‘समाजऋण फेडणे’ या संकल्पनांवर आधारित एक विशेष आणि अद्वितीय अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी गोयनका कुटुंबाने ‘एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (ईडीआयआय), अहमदाबाद सोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

स्वर्गवासी श्री नंद किशोर गोयनका यांच्यावर अग्रोहा, हिसार येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर, तेथे उपस्थित हजारो हितचिंतक आणि कुटुंबीयांच्या समोर डॉ. चंद्रा यांनी ही घोषणा केली. विविध ठिकाणांहून आलेल्या नागरिकांनी पवित्र आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. हे जनसामान्यांचे इतक्या मोठ्या संख्येने येणे, श्री नंद किशोर गोयनका यांनी आयुष्यभरात कमावलेला अथांग स्नेह, आदर आणि लौकिक अधोरेखित करते. त्यांच्या अंत्यसंस्काराला देशभरातील अनेक नामवंत प्रतिष्ठित व्यक्ती आणि प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते, जे त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि समाजकार्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी एकत्र आले होते. उपस्थित मान्यवरांमध्ये माननीय केंद्रीय मंत्री मनोहर लाल, माननीय माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन, हरियाणाचे माननीय कॅबिनेट मंत्री रणबीर गंगवा, माननीय राज्यसभा खासदार सुभाष बराला, हाँसीचे माननीय आमदार विनोद भयाना, हरियाणाचे माननीय माजी मंत्री कमल गुप्ता, आदमपूरचे माननीय आमदार चंद्र प्रकाश आणि नोहर, राजस्थानचे माननीय आमदार अमित चाचाण यांचा समावेश होता.

देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनीही गोयनका कुटुंबाला एक भावपूर्ण पत्र पाठवून शोकसंवेदना व्यक्त केल्या. यामध्ये त्यांनी स्वर्गवासी श्री नंद किशोर गोयनका जी यांचा उल्लेख एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून केला आहे व त्यांनी आपल्या अनेक दशकांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात कठोर परिश्रमाला सर्वोच्च स्थान दिले याचाही आवर्जून उल्लेख केला आहे. माननीय पंतप्रधानांनी पत्रात नमूद केले आहे की, त्यांनी केवळ व्यावसायिक परंपराच समृद्ध केल्या नाहीततर आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या देखील अत्यंत निष्ठेने पार पाडल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवासंघटन आणि राष्ट्र प्रथम‘ या भावनेने प्रेरित असलेलेत्यांचे जीवन साधेपणा आणि लोककल्याणाचे मूर्तिमंत उदाहरण होते. मी हे माझ्या भाग्य समजतो की मला त्यांना भेटण्याच्या संधी अनेकदा लाभल्या आणि त्यांचा मनमिळाऊ स्वभाव माझ्या स्मरणात कायम राहील. त्यांचे निधन ही समाजाची कधीही भरून न येणारी हानी आहे.”

देशभरातील विविध क्षेत्रांतील नामवंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी स्वर्गवासी श्री नंद किशोर गोयनका जी यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिला व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आंध्र प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नायब सिंह सैनी या प्रमुख राजकीय नेत्यांसह योगगुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. यासोबतच, कुमार मंगलम बिर्ला आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे एमडी व सीईओ सुंदररमन राममूर्ती यांच्यासह देशातील अग्रगण्य व्यावसायिक दिग्गजांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

स्वर्गवासी श्री नंद किशोर गोयनका जी यांच्या पवित्र  स्मृतीप्रित्यर्थ, गोयनका कुटुंबाने गोयनका सेवा सदन, देवी भवन मंदिर परिसर, हिसार येथे दररोज सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत ‘शांती बैठक’ आयोजित केली आहे. त्यांच्या जीवनप्रवासाला आणि महान वारशाला आदरांजली वाहण्यासाठी तसेच प्रार्थना करण्यासाठी स्नेही, हितचिंतक आणि समाजातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. याशिवाय, २६ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ४ या वेळेत महाराजा अग्रसेन भवन, ओल्ड गव्हर्नमेंट कॉलेज ग्राउंड, हिसार येथे ‘रस्म पगडी’ होणार आहे.

या अत्यंत कठीण आणि दुःखाच्या प्रसंगी देशभरातून मिळालेल्या अमाप प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल गोयनका कुटुंबाने सर्वांचे अंतःकरणापासून आभार मानले आहेत. यासोबतच, स्वर्गवासी श्री नंद किशोर गोयनका जी यांनी आयुष्यभर जोपासलेली मूल्ये आणि आदर्श पुढे नेण्याच्या आपल्या संकल्पाचा कुटुंबाने पुनरुच्चार केला.

स्वर्गवासी श्री नंद किशोर गोयनका जी यांचे १३ जुलै २०२६ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. ते त्यांच्या अंगी असलेली नम्रता, औदार्य आणि जनसामान्यांच्या कल्याणाप्रती असलेल्या अढळ कटिबद्धतेसाठी सर्वत्र आदरणीय होते. समाजातील अतुलनीय योगदानाच्या माध्यमातून त्यांनी सेवा आणि करुणा या मूल्यांचा प्रसार केला, तसेच आपल्या परोपकारी कार्याने व अमूल्य मार्गदर्शनाने त्यांनी असंख्य जीवनांमध्ये नवप्रकाश निर्माण केला.

Comments are closed.